Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

औंधमध्ये तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

पुणे – औंध येथील कस्तुरबा गांधी वसाहतीत आज (गुरुवार) पहाटे साडेपाचच्या सुमारास दुध वाटप करण्यासाठी गेलेल्या रोहीत अशोक जुनवणे (28 वर्षे) याची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहितच्या डोक्यात व हातावर वार करण्यात आले. यात डोक्याला गंभीर इजा होऊन, बोटही तुटले गेले. या अचानक झालेल्या हल्ल्याने सावरण्याची संधीच रोहीतला मिळाली नाही. जवळ असलेल्या नागरीकांनी रोहित यास एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार चालू असतानाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चतुश्रूंगी पोलिस तपास करत आहेत. रोहीत हे शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 7 चे पदाधिकारीही आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button