पहलगाम भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन
पिंपरीत घटनेचा निषेध करणार; सर्वस्तरीय उपस्थितीचे आवाहन

पिंपरी चिंचवड : जम्मू काश्मीर येथील पहलगाम भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या रविवारी (दि.२७ ) सायंकाळी ५ वाजता साई चौक, पिंपरी येथून सकल हिंदु समाजाच्या वतीने निषेध करीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी हिंदु बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा – ‘राज्यात नो डिनायल पॉलिसी लागू’; उपमुख्यमंत्री अजित पवार
पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यांमध्ये भारतीय नागरिकांना जीव गमवावा लागलाm ही घटना अतिशय निंदनीय आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा सकल हिंदू समाज मोर्चा काढून निषेध करणार आहे. असे हल्ले घडवणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे. हा मोर्चा पिंपरी, साई चौकातून सुरू होऊन रिवर रोड, कपडा मार्केट या मार्गे शगुन चौकात येऊन समारोप होणार आहे.