ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पर्यावरण जागृतीसाठी पुणे ते कन्याकुमारी ‘सायकल वारी’

सायकलपटू जितीन इंगवले यांची विधायक मोहीम: भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले कौतूक

पिंपरी : आपण प्रगती साधत असताना, आपल्याकडून कळत-नकळत निसर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत असताना, झाडांची कत्तल केली जाते. आगामी काळात स्वच्छ हवेचा प्रश्न गंभीर होणार आहे. पर्यावरणाचे सरंक्षण करावे, याची जनजागृती करण्यासाठी सायकलपटू जितीन इंगवले यांनी ‘पुणे ते कान्याकुमारी सायकल मोहिम’ यशस्वी केली.
पिंपरी-चिंचवडमधील सायकलपटू जितीन इंगवले व त्यांच्या ११ सहकाऱ्यांनी ‘पर्यावरण’ या संदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देश्याने दि. १६ ते २५ नोव्हेंबर दरम्यान पुणे ते कन्याकुमारी या सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेमध्ये त्यांनी १५५० किमीचे अंतर त्यांनी या दहा दिवसात पूर्ण केले. एका दिवसात सुमारे दीडशे किमीचा टप्पा ते रोज पार करत होते. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यातून त्यांनी प्रवास केला.

पहाटे ५ वाजता ते सायकल चालविण्यास सुरुवात करत असत. हा १५० किमीचा टप्पा गाठण्यासाठी रोज किमान १० ते ११ तास त्यांना सायकल चालवावी लागत असे. या मोहिमेत जितीन इंगवले यांच्यासह सुनील अडसूळ, संजय टिळेकर, चंद्रकांत ववले, संतोष दरेकर, संदीप बोडके, विनोद बोडके, गणेश गोरे, आशुतोष देसले, सुमीत पवार, रामदास दरेकर, अनिकेत इंगवले यांच्यासह वाहन सहाय्यक संतोष इंगवले सहभागी झाले होते.

जितीन इंगवले म्हणाले की, या मोहिमेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही सर्वजन दररोज किमान ३०-४० किमीचा तर आठवड्यातून एक दिवस १०० ते १२० किमी प्रवास करताना या मोहिमेचा सराव केला. यामुळेच ही अवघड मोहिम पूर्ण करण्यात आम्ही सर्वजन यशस्वी झालो आहोत.

सायकलपटू जितीन इंगवले आणि त्यांच्या ११ सहकाऱ्यांनी पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी एवढी मोठी मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली याबाबत त्यांचे मनापासून अभिनंदन. मनाचा निग्रह आणि सरावातील सातत्य या दोन गोष्टींच्या जोरावर एवढी मोठी मोहीम पूर्ण करण्यात या सर्वांना यश मिळाले आहे. या मोहिमेतून त्यांनी ‘पर्यावरण वाचविण्याचा’ संदेश देखील महत्वपूर्ण आहे.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button