breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त फक्त ५५ रूपये लिटरने पेट्रोल वाटप

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५५ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्लासनगरमध्ये ५५ रूपये लिटरने पेट्रोल वाटप करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नवनिर्मान विद्यार्थी सेनेने हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड शहरात उद्या पाणीकपात, शुक्रवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

उल्लासनगर कॅम्प ५ मधील हिललाईन परिसरातील पेट्रोल पंपावर हे पेट्रोल वाटप सुरू आहे. यासाठी नागिरीकांना कूपन वाटप करण्यात येत आसून प्रत्येक नागरिकाला १ लिटर या प्रमाणे ५५ रूपये लिटरने पेट्रोल वाटप सुरू आहे.

राज ठाकरे यांचा वाढदिवस आमच्यासाठी एखाद्या सणासारखा असून त्यामुळेच हा सण साजरा करण्यासाठी आणि वाढत्या महागाईवर उपाय म्हणून आम्ही ५५ रूपये लिटरने पेट्रोल वाटप करत असल्याचं मनोज शेलार यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button