TOP Newsताज्या घडामोडीपुणे

कोयना एक्स्प्रेससह पुणे-सातारा डेमू उद्या रद्द

पुणे : पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील वाल्हे आणि नीरा स्थानकांदरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरणाशी संबंधित कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे २० ऑक्टोबरला कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस आणि पुणे-सातारा दरम्यान धावणाऱ्या डेमू गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे २३ ऑक्टोबरला पुणे-फलटण आणि पुणे-लोणंद मार्गावरील गाडीही रद्द करण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून कळविण्यात आले आहे.

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस १९ ऑक्टोबरला रद्द करणयात आली आहे. २० ऑक्टोबरला ही गाडी कोल्हापूरहून संध्याकाळी सात वाजता रवाना केली जाणार आहे. पुणे-सातारा मार्गावर काही गाड्या अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस २३ ऑक्टोबरला, पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस कोल्हापूर-सातारा दरम्यान धावणार आहे. ही गाडी सातारा ते पुणे दरम्यान रद्द राहणार आहे. २३ ऑक्टोबरला हुबळीवरून रवाना होणारी हुबळी-दादर एक्स्प्रेसही मिरज-कुर्डूवाडी या बदललेल्या मार्गाने धावेल. त्यामुळे ही गाडी सांगली आणि कराड स्थानकांवर येणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button