breaking-newsताज्या घडामोडीपुणे

Pune | वडिलांच्या आजारपणासाठी घेतलेले उसने पैसे फेडून घेण्यासाठी लावले वेश्याव्यवसायाला

पुणे | वडिलांच्या आजारपणासाठी घेतलेले ३० हजार रुपये परत करू न शकल्यामुळे सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत तिला पंधरा दिवस लॉजवर डांबून ठेवण्यात आल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोघाजणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका तरुणीला अटक करण्यात आली आहे.

पूनम आकाश माने (वय २२, रा. शंकर मंदिराजवळ, कात्रज गावठाण, कात्रज) असे अटक महिलेचे नाव आहे. तिचा साथीदार आकाश सुरेश माने (वय २४) हा फरार झाला आहे. याप्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार ऑक्टोबर २०२३ ते १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधी दरम्यान फिर्यादी मुलीच्या घरी, के. के. मार्केट जवळील इशा लॉज, त्रिमूर्ती चौकाजवळ असलेल्या रिलॅक्स लॉजमध्ये तसेच धनकवडी येथील सायबा लॉज या ठिकाणी घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलीचे वडील आजारी असताना या आजारपणाच्या उपचारासाठी तिने आरोपींकडून तीस हजार रुपये उसने घेतले होते. हे पैसे ती परत देऊ शकली नाही.

हेही वाचा  – ‘माझा परिवार सोडला तर बाकी माझ्या विरोधात..’; अजित पवारांचं विधान

त्यामुळे आरोपींनी तिला जबरदस्तीने के के मार्केट जवळ असलेल्या ईशा लॉज येथे नेले. तिथल्या एका रूममध्ये दहा ते पंधरा दिवस डांबून ठेवले. त्यानंतर आरोपी आकाश माने याने तिच्यावर दोन वेळा जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर या आरोपींनी मिळून या मुलीला ‘माझे पैसे दे, पैसे नाही दिले तर कुठून देखील वसून करून दे. नाहीतर तुला सोडणार नाही’ अशी दमदाटी करून तिच्याकडून वारंवार शरीर विक्री करून घेऊन येणाऱ्या ग्राहकांकडून पैसे स्वीकारत आर्थिक लाभ घेतल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button