Uncategorizedताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे सन्मान

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे सन्मान

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची नुकतीच पुण्याचे पालकमंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या ही योग्य निवड व उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात त्यांच्याकडून केल्या गेलेल्या कामगिरीबद्दल सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या वतीने त्यांना ‘राष्ट्रीय सूर्यभूषण पुरस्कार-२०२२’ प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, सूर्यदत्तचा स्कार्फ, सम्मानपत्र व भारताचा नकाशा असलेले मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते पाटील यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सहायक उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, संचालक प्रशांत पितालिया व प्रशांत गोलेचा, संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.

संस्थेच्या कार्याबद्दल चोरडिया दाम्पत्याने पाटील यांना माहिती दिली. तसेच त्यांनी सूर्यदत्त संस्थेत येऊन प्राचार्य, संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. या विनंतीचा स्वीकार करून पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार असल्याचे आश्वासन दिले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान आहे. तसेच निश्चितपणे येणाऱ्या काळात संस्थेस सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला आवडेल.” पाटील यांचे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान व राष्ट्रउभारणीतील योगदान याचा सन्मान म्हणून त्यांचा गौरव केल्याचे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button