TOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

कितीही त्रास द्या, मी सर्वांच्या उरावर बसेन

खडसेंचे शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान

विरोधक रोज म्हणतात, कुछ ना कुछ होनेवाला है, मात्र कुछ नही होनेवाला है, मै तुम्हारे उरा पे बैठनेवाला हूँ.. मला कितीही त्रास द्या, मी सर्वांच्या उरावर बसेन, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते एकानाथ खडसे यांनी शिंदे फडणवीस सरकारला दिला आहे. रावेर तालुक्यातील ऐनपूरमध्ये राष्ट्रवादीच्या जनसंवाद यात्रेत बोलताना खडसेंनी शिंदे फडणवीस सरकारवर जहरी टीकास्त्र डागले आहे.

विरोधकांकडून सातत्याने छळ सुरु असून मला अडविण्यात येत आहे. काहींना काहीतरी खोटे नाटे करून मला जेलमध्ये टाकायचे आहे आणि निवडणुका सुरळीत पार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. पण जनतेच्या आशीर्वादाने मी सर्वांना पुरून उरेल, असं म्हणत खडसेंनी एकप्रकारे शिंदे फडणवीस सरकारला थेट आव्हान दिले आहे.माझा कितीही छळ केला मला कितीही त्रास दिला तरी मी सर्वांच्या उरावर बसेन असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

बच्चू कडू – रवी राणा यांच्यातील वादावरही खडसेंनी प्रतिक्रिया दिला आहे. राणांनी बच्चू कडूंवर खोके घेतल्याचा आरोप केले होते. त्यावर बच्चू कडूंनी पुराव्यानिशी आरोप सिद्ध करण्याचे आव्हान त्यांना दिले. बच्चू कडू यांनी आपल्या संपर्कात सात ते आठ आमदार असून पुरावे नाही दिले तर निर्णय घेण्याचा इशाराही दिला आहे. त्यांनी एकप्रकारे सरकारलाच आव्हान दिलं आहे. बच्चू कडू यांची ही सुरुवात आहे. त्यामुळे शिंदे गटात गेल्या बंडखोरांमध्ये अस्वस्थता आहे. हळूहळू ही अस्वस्थता बाहेर येत आहे. बच्चू कडू यांच्या माध्यमातून ही सुरुवात आहे, असा दावा खडसे यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button