TOP Newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमराठवाडामहाराष्ट्रराजकारण

सार्वजनिक कार्यक्रमात मांसाहारावर मारला ताव; अन् थोड्याच वेळात रुग्णालयांत करावे लागले भरती…

परभणी : परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील दगडवाडी येथे देवीच्या पूजेनिमित्त बकरे कापण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे आयोजन दगडवाडी येथील देविदास राठोड यांनी केले होते. आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मांसाहार खाल्ल्याने १३ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या १३ जणांवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्रकृती चांगली झाल्यानंतर रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील दगडवाडी येथे बुधवारी मांसाहाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये मांसाहार खाल्ल्यानंतर विकास चव्हाण वय ३३ वर्ष, अनिल चव्हाण वय २५ वर्ष, अरुण चव्हाण वय २५ वर्ष, मधुकर राठोड वय ३० वर्ष, राहुल राठोड वय २६ वर्ष, जनाबाई राठोड वय ७५ वर्ष, महानंदा राठोड वय ५५ वर्ष, कमलाबाई चव्हाण वय ६० वर्ष, मीराबाई राठोड वय ३५ वर्ष, शोभाबाई जाधव वय २५ वर्ष, संगीता पवार वय २३ वर्ष, पुष्पा राठोड वय १८ वर्ष यांना चक्कर, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने त्यांना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

कर्नाटकात रंगले नाराजीनाट्य; भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अनेकांचा बंडाचा झेंडा

या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी पंडित चट्टे यांनी त्यांची तपासणी केली असता १३ जणांना जेवणातून विषबाधा झाल्याचं लक्षात आलं. विषबाधा झालेल्यांवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले असून सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये जेवण केल्याने १३ जणांना विषबाधा झाल्याने दगडवाडी गावामध्ये एकच धावपळ उडाली होती. या अगोदर देखील परभणी शहरामध्ये लग्न समारंभामध्ये जेवण केल्यामुळे १००हूनअधिक जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button