breaking-newsताज्या घडामोडीलेख

Mahashivratri : भगवान शिवाची स्वयंभू मंदिर

महाईन्यूज | प्रतिनिधी | मयुरी सर्जेराव |

भगवान शिव स्वत:हा स्वयंभू असल्यांच म्हटलं जात…एवढच नाही तर भगवान शंकराचे असे अनेक मंदिर आहे जी स्वयंभू आहेत..तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण अशाच काही स्वयंभू असणा-या शंकराच्या मंदिरांबाबत जाणून घेऊयात…

1… अलिबाग , कार्लेखिंड

अलिबाग तालुक्यात मापगाव येथील डोंगरावर निसर्गरम्य ठिकाणी हे पवित्र शंकराचे देवस्थान उभारण्यात आलं आहे. याच मंदिराला कणकेश्वर मंदिर असं म्हटलं जात…हे शंकराचे स्वयंभू लिंग असलेलं मंदीर आहे… कणकेश्वर देवस्थानचा इतिहास पुरातन आहे. कनकेश्वर शिवमंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तेथे अनेक ऋषी-मुनी होवून गेले. अलिबाग शहरापासून पंधरा ते वीस किमी अंतरावर हे स्थळ आहे.भाविकांना जाण्या-येण्यासाठी वाहने आहेत. महाशिवरात्र उत्सवाच्या पहाटे देवाची विधिवत पूजा होते. तेव्हापासून भाविक भोलेनाथाच्या दर्शनासाठी उपस्थित असतात. ते. रात्री रंगीबेरंगी फुलांनी सजवलेला मंदिराचा गाभारा डोळ्यांना सुखावून जातो…या दिवस अनेक भाविक आपापल्या नवसानुसार उपवासाच्या पदार्थांचे येणाऱ्या भाविकांना दान करत असतात.

2…मेढे, वाकेश्वर मंदिर

शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अवचितगड किल्ल्याच्या पायथ्याशी मेढे हे गाव आहे. या गावात ऐतिहासिक स्वयंभू वाकेश्वर हे देवस्थान आहे. रोहा तालुक्यातील अनेक भाविक श्री महाशिवरात्री उत्सवदिनी,श्रावणी सोमवारी वाकेश्वर मंदिरात येवून न चुकता दर्शनाचा लाभ घेतात.साधारण अठराव्या शतकाच्या मध्यावर चोरांनी चोरी करण्याच्या दृष्टीने मेढा गावावर चाल केली असता एकाएकी असंख्य भुंगे निर्माण होवून चोरांना चावून चावून सळो की पळो करून सोडलं अशी एक अख्यायिकाही सांगितली जाते. याशिवाय सर्पदंश झाल्यास या मंदिरात त्या व्यक्तीस रात्रभर जागे ठेवून श्री वाकेश्वराचे नामस्मरण केले जाते…महाशिवरात्रीचा उत्सव म्हटलं की, मेढा गावचा उत्साह ओसंडून जातो. माघ कृष्ण एकादशी ते अमावस्या असा चार दिवस हा उत्सव थाटामाटात साजरा होतो

3…बीड, संस्थान नारायण गड

हे तीर्थक्षेत्र बीडपासून २१ किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिराच्या उत्तर बाजूस पूर्वेकडे तोंड असलेले एक महादेवाचे मंदिर आहे हे मंदीर देखील स्वयंभू म्हणून ओळखले जाते…यास स्वयंभू म्हणण्याचे कारण म्हणजे यातील शिवलिंगाची स्थापना कोणीही केलेली नसून ती आपोआप निर्माण झालेली आहेत.हे मंदिर एका सहा गुणीले नऊ फुट आकाराच्या शिळे भोवती बांधण्यात आलेले आहे. याचा विशेष चमत्कार असा कि या शिळेवर दर बारा वर्षांनी एक नवीन शिवलिंग उदयास येते. पूर्वीच्या शिवलिंगांची वाढ होते. या शिळेवर आतापर्यंत एकूण छत्तीस ३६ शिवलिंगाची निर्मिती झाली असून त्या सर्वाची वाढ सुरु आहे. म्हणजेच हे देवस्थान ४३२ वर्षां पासून आहे. दर वर्षी कार्तिक शु. १५ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते ती त्रिपुरारी पोर्णिमा असते त्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुर नावाच्या दैत्याचा वध केला. त्या निमीत्ताने आनंद उत्सव म्हणून हि यात्रा भरते पुढे आठ दिवस सुरु असते.आणि शिवरात्रीच्या वेळी तर भाविकांची अलोट गर्दी पहायला मिळते…

4… अंबरनाथ, शंकराचे हेमांडपंथी मंदिर

ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ हे गाव आहे. या गावात महाराष्ट्रातील हेमांडपंथी मंदिरांमध्ये उत्कृष्ठ नमुना असे ज्याचे वर्णन करावे, असं एक मंदिर आहे… या मंदिराच्या गाभार्‍यात पाहिलं तर नेहमीच्या प्रतिकृतितले शिवलिंग नाहीये. शिवलिंगाऐवजी एक उंचवटा आहे. यालाच स्वयंभू शिवलिंग मानून त्याची पूजा केली आहे. हे अतिशय जागृत देवस्थान आहे.11 व्या शतका शिलाहार राजघराण्याने हे मंदिर बांधलं…या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदीमंडप कालौघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून शाबूत आहे. या मंदिराच्या स्थापत्याने आधुनिक अभियंते देखील याचा अभ्यास करायला प्रवृत्त झाले आहेत.म्हणूनच मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचे बांधकाम करताना वास्तुविशारदांनी अंबरनाथच्या मंदिराचा अभ्यास केला आणि त्यानुसार त्यांनी सिद्धिविनायक मंदिराचे बांधकाम केले आहे.

5… उत्तराखंड , केदारनाथ

केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचं मंदिर आपल्या सर्वांनाच माहित आहे… हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. गौरीकुंडहून १४ किलोमीटर लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते.हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा ह्या कालावधीमध्येच खुले असते व हिवाळ्यामध्ये येथील देवांच्या मुर्ती उखीमठ ह्या स्थानवर आणल्या जातात व तेथेच त्या पुजल्या जातात.२०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसक पुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले व मंदिर परिसराचे देखील मोठे नुकसान झाले. परंतु दगडी केदारनाथ मंदिराला मात्र धक्का पोचला नाही.

6…रत्‍नागिरी, धूतपापेश्वर मंदिर

रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावामध्ये धूतपापेश्वर हे प्रसिद्ध शिवमंदिर आहे…राजापूर शहरापासून सुमारे ५ किलोमीटरवर अंतरावर हे गाव लागते. सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होते.पाप धुऊन काढणारा ईश्वर म्हणून धूतपापेश्वर मंदिरात भाविक जातात…य़ा मंदिराच्या सभोवतालचा परिसर अतिशय रम्य आहे..तर, मंदिरही प्राचीन आहे. प्रशस्त असा सभामंडप, अंतर्गृह, गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरात येताक्षणी मन प्रसन्न होते. प्रवेशद्वारावर नगारखाना व आवारात दीपमाळा आहेत.मंदिराशेजारी काळ्या कातळावरून खाली झोकून देणारा मृडानी नदीचा प्रवाह आहे… पावसाळ्यात याच कोसळणा-या पाण्याचा सुंदर धबधबा पहायला मिळतो…वरून खाली पाणी जेथे कोसळते तेथे एक डोह बनला आहे. त्या डोहालाच “कोटितीर्थ” म्हणतात…

7…मध्यप्रदेश , महाकालेश्वर मंदिर

भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जाणार महाकालेश्वर मंदिर…मध्यप्रदेशमधील उज्जैन नगरमध्ये , महाकालेश्वरचं प्रमुख मंदिर आहे… हे मंदिर स्वयंभू, भव्य और दक्षिणमुखी आहे…त्यामुळे महाकालेश्वर महादेवाची अत्यंत पुण्यदायी महती आहे…महाकालेश्वर महादेवाच्या दर्शनाने मोक्ष मिळतो असं म्हटलं जातं…

8… गुजरात, निष्कलंक महादेव

गुजरात च्या भावनगरमध्ये कोलियाक बंदरापासून 3 किमी आतमध्ये अरब समुद्रामध्ये निष्कलंक महादेव आहे…इथे एकूण पाच स्वयंभू शिवलिंग आहेत…समुद्राचं पाणी रोज या शिवलिंगावर जलअभिषेक करतात…या शिवलिंगाजवळ एक कुंड आहे … अक्षय तृतीयाला या कुंडातून स्वत: गंगा प्रकट होत असल्याचं म्हटलं जात..आणि या कुंडातील पाण्याने अंघोळ करण पुण्याचं मानलं जात…या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे रात्री 10 पर्यंत शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी पण समुद्रात जाऊ शकतो…10 पर्यंत समुद्राला भरती येत नाही..मंदिराचा रस्ता अगदी मोकळा असतो..मात्र 10 नंतर तिथे दर्शनासाठी जाऊ दिलं जात नाही…तसंच असही मानलं जात की आपल्या जवळच्या व्यक्तीचं निधनं झालं तर त्याची राख आणून शिवलिंगावर लावली तर त्या व्यक्तीला मोक्ष मिळतो…

9…कर्नाटक , सहस्त्रलिंग

कर्नाटकच्या कन्नडा जिल्ह्यात शामला नदीमधील दगडांवर हजारो शिवलिंग आहेत..यालाच सहस्त्रलिंग असही म्हटलं जात…नदीच्या पाण्यामुळे या शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक होत असतो…या दगडांवर शिवलिंगासोबत नंदी ,साप अशा अनेक प्रतिकृती तयार झाल्याचं पहायला मिळतात… वैज्ञानिकांच्या मते नदीच्या पाण्यामुळे शिवलिंग आणि बाकीच्या प्रतिकृती तयार झाल्या आहेत…उन्हाळ्यात नदीचं पाणी जेव्हा आटत तेव्हा नदीमधील हा नजरना पहाण्याजोगा आणि मनाला प्रसन्न करणारा असतो…त्यामुळे शामला नदिला गंगा प्रमाणे पवित्र मानलं जात…मात्र या हजारो शिवलिंग आणि बाकीच्या प्रतिकृती कुठून आल्या याचं रहस्य आजपर्यंत उघडं झालं नाहीये…

तर असे अनेक शिव मंदिर आहे ज्यांची अख्यायिका खरोखरचं आवाक करणारी आहे….

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button