breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणे

‘रेड झोन’च्या मोजणी झाल्यास ५ हजार घरांना ‘ऑन दी स्पॉट’ दिलासा

क्रीडा समितीचे माजी सभापती उत्तम केंदळे यांचा विश्वास : ‘टेन्टेटिव्ह रेड झोन लाईन’ सुमारे १५७ मीटरने कमी होणार

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

‘रेड झोन’मुळे यमुनानगर आणि कृष्णानगरमधील ८० टक्के भाग प्रभावित आहे. २०१९ मध्ये टेन्टेटिव्ह लाईन घोषित केली होती. आता रितसर मोजणी आणि सर्व्हेक्षण झाल्यास या भागातील सुमारे ५ हजार घरे रेडझोनच्या हद्दीबाहेर होतील. तसेच, रेड झोनची हद्द तात्काळ प्रभावाने १५७ मीटर कमी होईल, असा विश्वास पिंपरी-चिंचवड महापालिका क्रीडा समितीचे माजी सभापती उत्तम केंदळे यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवडमधील बहुप्रतिक्षित ‘रेड झोन’ चा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी २०१४ पासून भाजपा अमादार महेश लांडगे पाठपुरावा करीत आहेत. संरक्षण विभागाने नुकतीच रेड झोनच्या मोजणीसाठी ‘एनओसी’ दिली आहे. ही प्रक्रिया ‘रेड झोन मुक्त पिंपरी-चिंचवड’ च्या दृष्टीने पहिले पाऊल मानले जात आहे.

उत्तम केंदळे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे तत्कालीन अध्यक्ष सदाशिव खाडे आणि आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने रेड झोनची हद्द मोजून द्यावी, अशी आग्रही मागणी केली होती. २०१९ मध्ये मोघमपणे हद्द मोजण्यात आली. त्यामुळे अजिंठानगर येथील ‘जेएनएनयुआरएम’योजनेतील ‘एसआरएस’चा प्रकल्प रेड झोनमधून बाहेर निघाला. २०१७ मध्ये या प्रकल्पासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यानुसार २०१९ मध्ये टेन्टेटिव्ह मोजणी झाली. हा प्रकल्प रेडझोनमधून बाहेर आला. परंतु, कृष्णानगर सेक्टर २०, यमुनानगर सेक्टर २१, सेक्टर २२ आणि सेक्टर २३ ची हद्द अद्याप निश्चित नाही.परिणामी, रेड झोनची टांगती तलवार कायम आहे.

गतवर्षी पुणे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात बैठक झाली. त्यावेळी आमदार महेश लांडगे यांनी रेड झोनची हद्द आणि बाधित मिळकतींची संख्या निश्चित करावी, अशी आग्रही मागणी केली. सध्या २००० हजार यार्डमध्ये सरसकट कोणालाच बांधकाम अथवा पायाभूत सोयी-सुविधांना परवानगी मिळत नाही. ‘रेड झोन मुक्त पिंपरी-चिंचवड’ करायचे असेल, सर्वप्रथम त्याची मोजणी करुन बाधित मिळकतींचे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे, असा दावाही उत्तम केंदळे यांनी केला आहे.

रेड झोन हद्द ५०० यार्ड करण्यासाठी बळ मिळणार..!

रेड झोनची मोजणी झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोनची हद्द ५०० यार्ड करावी, यासाठी पाठपुरावा करता येईल. मोजणीमुळे रेड झोन वाढेल, ही नागरिकांच्या डोळ्यांत धुळफेक आहे. पूर्वी संरक्षण विभागाने २ हजार यार्ड रेड झोन जाहीर केला. २०१९ मध्ये मोजणी करुन टेन्टेटिव्ह लाईन आखण्यात आली. १ यार्ड म्हणजे 0.9144 मीटर अंतर असते. प्रशासनाने २ हजार यार्ड म्हणजे मोघमपणे २ हजार मीटर गृहित धरले आहे. वस्तुत: ते अंतर १८२८.८ मीटर इतके आहे. त्याद्वारे सर्वे नंबर टेन्टेटिव्ह रेड झोन प्रभावित केले आहेत. वास्तविक, १८२८.८ मीटरच रेड झोन आहे. त्यामुळे मोजणी निश्चित केल्यास तात्काळ १५७ मीटर क्षेत्र रेड झोन मधून बाहेर जाईल. विशेष म्हणजे, संरक्षण विभागाने २००२ मध्ये २००० यार्डचा रेडझोन लादला आहे. पूर्वी तो ५०० यार्डच होता. त्यामुळे व्यापक जनहिताच्या दृष्टीने रेड झोनची मोजणी झाल्यास केंद्र सरकार, संरक्षण विभागाकडे रेड झोन कमी करण्याबाबत पाठपुरावा करण्यास बळ मिळणार आहे, असा दावाही उत्तम केंदळे यांनी केला आहे.

यमुनानगर, कृष्णानगर भागातील रेड झोनबाबत मोजणी करण्यासाठी तत्कालीन नवनगर विकास प्राधिकरणाच्या सभेमध्ये २०२१ मध्ये ठराव करण्यात आला. राज्य सरकारच्या कार्यक्षेत्रातील या प्राधिकरणाने नागरिकांना प्लॉट दिले. त्या ठिकाणी घरे बांधली आहेत. त्यावर रेडझोन दाखवला असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. शासनाने दिलेल्या आणि प्लॅन मजूर करुन बांधलेली घरे रेड झोनबाधित होवू शकत नाहीत. यासाठी अनेक वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करीत आहोत. वर्क ऑफ डिफेन्स ॲक्ट-१९०३ नुसार रेड झोनची मोजणी होणे आवश्यक आहे. मोजणीसाठी आवश्यक फी महापालिका प्रशासनाने प्राधिकरणाला कळवावी, अशी सूचना विभागीय आयुक्तांनी दिली होती. प्राधिकरण पेठ क्रमांक २० ते २४ मधील वारस नोंद, सदनिका, गाळे, भूखंडाचे हस्तांतरण यामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यासाठी रेडझोनचे सीमांकन करण्याची आवश्यकता आहे. रेड झोन मोजणी आणि मिळकतींचे सर्वेक्षण केल्यानंतर ५०० यार्डपर्यंत रेड झोन कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button