breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी महापालिकेच्या ‘महापौर विकास निधी’साठी 21 कोटी रुपयांची तरतूद

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर विकास निधीमध्ये थेट चौपट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सुमारे 5 कोटी तरतूद ठेवली जात होती. परंतु, आगामी 2021-22 आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात पुणे महापालिकेच्या धर्तीवर महापौर विकास निधीसाठी 21 कोटी रुपयांची तरतूद उपसूचनेद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे आता पालिकेच्या महापौरांच्या अर्थकारणालाही गती मिळणार आहे.

महापालिकेमार्फत वाढत्या लोकसंख्येनुसार रस्ते, पाणी, पदपथ, पथदिवे आदी अत्यावश्‍यक सोयी सुविधा नागरिकांना पुरविण्यात येतात. या सुविधांसाठी आवश्‍यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यासाठी महापौर विकास निधी या लेखाशीर्षावर विशेष तरतूद केली जाते. महापौरांच्या अधिकारात हा निधी आवश्‍यक तेथे खर्च केला जातो. दरम्यान, महापौर विकास निधीसाठी मागील 2020-21 च्या मंजूर अंदाजपत्रकात 5 कोटी 35 लाख रुपये तरतूद केली होती. मात्र, शहरातील औद्योगिकीकरणामुळे दिवसेंदिवस लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात रहिवाशी व नागरी क्षेत्रात वाढ होत आहे.

त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून विविध पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महापौर विकास निधी अंदाजपत्रकीय तरतूद अपुरी पडत आहे. नागरिकांच्या दृष्टीने अत्यावश्‍यक व प्राधान्याने पार पाडावयाच्या मुलभूत विकास कामांसाठी पुणे महापालिकेप्रमाणे महापौर विकास निधीसाठी वाढीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी महापौर माई ढोरे यांनी केली होती. त्यानुसार स्थायी समितीने आयत्यावेळी उपसूचना देऊन सन 2021-22 च्या मूळ महापालिका अंदाजपत्रकात महापौर विकास निधी या लेखाशीर्षावर चौपट वाढ करत 21 कोटी इतकी तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button