breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराविरोधात अमेरिकेत निदर्शने

ह्यूस्टन |

अमेरिकेतील किमान तीस शहरांत पश्चिम बंगालमधील निवडणुकोत्तर हिंसाचारा विरोधात निदर्शने झाली असून त्यात बंगाली भारतीयांचा समावेश होता. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर २ मे रोजी हिंसाचार झाला होता. त्यात भाजपने त्यांचे काही कार्यकर्ते मारले गेल्याचा आरोप केला होता. त्या हिंसाचारात अनेक जण जखमीही झाले होते. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या आठवडय़ातील निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळवून दिला होता. हिंदू लाइव्हज मॅटर, प्रोटेस्ट अगेन्स्ट हिंदू जिनोसाईड असे घोषणाफलक निदर्शकांच्या हातात होते.

जुधाजित सेनमझुमदार या सिलॉकॉन व्हॅलीतील तंत्रज्ञ उद्योजकाने सांगितले,की आम्ही दूर अंतरावर असूनही आम्ही पश्चिम बंगालमधील व्यक्तींच्या भावना समजू शकतो. पश्चिम बंगाल निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भारतातील आमच्या मित्रांचे त्यांच्यावर हल्ले होत असल्याचे दूरध्वनी आले. दुकाने लुटण्यात येऊन बॉम्बफेक करण्यात आली. दरम्यान या सगळ्या प्रकरणी अमेरिका, ब्रिटनमधील मोठय़ा शहरात निदर्शने करण्यात आली. निदर्शकांनी या हिंसाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ह्यूस्टन येथील सहाना सिंह यांनी सांगितले, की हिंदू महिलांना फरपटत बाहेर आणून मारण्यात आले, त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले. मी कोलकात्यात वाढलेली आहे. तेथील संस्कृती वेगळी आहे. अशा ठिकाणी महिलांशी असे क्रूर व सूडाचे वर्तन करण्यात आले. केवळ राजकीय मतभेदातून हे सगळे करण्यात आले आहे.

  • हिंसाचारग्रस्त भागांचा लवकरच दौरा : राज्यपाल

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचाराचा उद्रेक झाला त्याबद्दल राज्यपाल जगदीप धनखार यांनी चिंता व्यक्त केली आणि हिंसाचारामुळे बाधित झालेल्या भागांचा आपण लवकरच दौरा करणार असल्याचे सोमवारी राज्यपालांनी सांगितले. मतदान करण्यासाठी लोकांना आपल्या जिवाची किंमत मोजावी लागत आहे, निवडणुकीनंतर हिंसाचाराचा उद्रेक झाला त्यामुळे निर्माण झालेली स्थिती चिंताजनक आहे, त्यामुळे राज्यातील हिंसाचारग्रस्त भागांना आपण भेट देणार आहोत, असे राज्यपाल म्हणाले. हिंसाचारग्रस्त भागांच्या दौऱ्यावर आपण जाणार आहोत त्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी अशी विनंती आपण केली आहे, मात्र राज्य प्रशासनाकडून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही, असेही धनखार म्हणाले.

  • करोना रोखण्यासाठी कठोर उपाय- ममता

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आखण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी संगितले. जर संपूर्ण टाळेबंदी जारी केली तर त्यामुळे लोकांच्या उपजीविकेवर परिणाम होईल, असेही त्या म्हणाल्या. केंद्र सरकारने सर्वासाठी लस विनामूल्य उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. संपूर्ण टाळेबंदी लागू केल्यास लोकांच्या उपजीविकेवर परिणाम होईल, असे त्यांनी सांगितले. केंद्राकडे तीन कोटी लशीच्या मात्रांची मागणी करण्यात आली आहे, त्यापैकी एक कोटी खासगी रुग्णालयांना उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्या म्हणाल्या. राज्यात शांतता आहे, निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचे बनावट व्हिडीओ जो व्हायरल करील त्याच्याविरुद्ध सरकार कडक कारवाई करील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

वाचा-#Covid-19: ‘चीनकडून २०१५ मध्येच करोनाचा जैविक अस्त्र म्हणून विचार’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button