breaking-newsक्रिडा

अर्जेंटिनाच्या पंतप्रधानांना हस्तक्षेपाची विनंती…

लिस्बन – इस्राइलविरुद्ध आज (शनिवारी) होणार असलेला सराव सामना रद्द करण्याचा निर्णय अर्जेंटिनाने घेतल्यामुळे इस्राइलने पॅलेस्टिनींविरुद्ध जागतिक फुटबॉल महासंघाकडे तक्रार नोंदविली आहे. इस्राइलच्या निर्मितीसाठी झालेल्या युद्धात असंख्य पॅलेस्टिनी नागरिक मृत्युमुखी पडलेल्या जागेवर उभारण्यात आलेल्या जेरुसलेम येथील टेडी कोलेक स्टेडियमवर अर्जेंटिना विरुद्ध इस्राइल हा सामना आज (शनिवारी) होणार होता. परंतु पॅलेस्टिनी फुटबॉल संघटनेचे प्रमुख जिब्रिल राजौब यांनी अरब फुटबॉलशौकिनांना अर्जेंटिनाविरुद्ध निदर्शने करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यामुळे अर्जेंटिनाने हा सामना रद्द केल्याची घोषणा केली होती.

अर्जेंटिनाने हा सामना रद्द करणे हा पॅलेस्टिनी समर्थक आणि इस्राइलविरोधी गटांचा विजय मानला जात असल्यामुळे अर्जेंटिनाने हा सामना रद्द केल्याची कोणतीही प्रतिक्रिया तत्काळ उमटली नसली, तरी इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष मॉरिशिओ मॅक्री यांना थेट दूरध्वनी करून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केल्याचे वृत्त आहे. परंतु या संदर्भात कोणतीही माहिती देण्यास अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने नकार दिला. इस्राइलचे समर्थन करणाऱ्या कोणत्याही देशाविरुद्ध निदर्शने करणाऱ्या गटानेही अर्जेंटिनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button