breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

राजपथावरील संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला केेंद्राकडून अखेर परवानगी

 

नवी दिल्ली | प्रतिनिधी 
प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणार्‍या संचलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या चित्ररथाला अखेर केेंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. याआधी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला होता. परंतु, आता केंद्राने अचानक निर्णय बदलल्याने महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात सहभागी होणार आहे.

महाराष्ट्राच्या चित्ररथावरील यंदाच्या देखाव्यातून राज्यातील जैवविविधतेचे दर्शन घडवले जाणार आहे. यामध्ये राज्यप्राणी, राज्यपक्षी यांसह महाराष्ट्रात आढळणार्‍या विविध सजीव प्रजातींचा समावेश असेल. महाराष्ट्राचा चित्ररथ हा नेहमीच राजपथावरील संचलनाचे आकर्षण राहिला आहे. आता महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा सर्वोत्तम ठरणार का?, हेदेखील पाहावे लागणार आहे.

दरम्यान, 26 जानेवारीला राजपथावर होणार्‍या संचलनात देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात. यामध्ये विविध राज्यांच्या चित्ररथांना प्रत्येकवर्षी ठराविक निकषांनुसार संधी दिली जाते. महाराष्ट्राच्या चित्ररथांनी 2015 नंतर दोन वेळा सर्वोत्तम चित्ररथाचा किताब पटकवला आहे. 2015 मध्ये ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. तर 2018 रोजी ‘शिवराज्याभिषेक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. या दोन्ही चित्ररथांनी प्रथम क्रमांक पटकावला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button