breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सुप्रिया सुळेंचं अजित पवार गटाला प्रत्युत्तर; म्हणाल्या, देशातील लहान लेकरालाही..

मुंबई : अजित पवार यांचा एक जुना व्हिडीओ शरद पवार गटातील नेत्यांकडून शेअर केला जात आहे. यामध्ये अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर भाष्य करताना दिसत आहेत. बहुसंख्य आमदार तुमच्या बाजुने असले तरी तुम्हाला पक्षावर दावा सांगता येणार नाही. मनसेचा एकच आमदार आहे, त्याने बंडखोरी केली तर मनसे पक्ष त्यांच्याबरोबर आहे, असं होत नाही. पक्ष संघटना राज ठाकरेंबरोबर आहे, असं वक्तव्य अजित पवार करताना व्हिडीओत दिसत आहे.

यावरून अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी जे वक्तव्य केलं होतं, ते एका आमदाराबद्दल होतं. पण त्याचबरोबर अजित पवार असंही बोलले होते की, संघटनेचे पदाधिकारी हे राज ठाकरेंबरोबर आहेत. महाराष्ट्रात आणि देशात ८० टक्के लोक अजित पवारांबरोबर आहेत. दोन तृतीयांशपेक्षा अधिक लोक अजित पवारांबरोबर आहेत. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह अजित पवारांनाच मिळेल, असं सुरज चव्हाण म्हणाले.

हेही वाचा – Monsoon Update : राज्यात आज पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

सूरज चव्हाण यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट पडली नाही. पक्षात कोणतंही भांडण अथवा वाद नाही. या पक्षाची स्थापना शरद पवारांनी २५ वर्षांपूर्वी केली होती. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अगदी लहान लेकरालाही माहीत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार..आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button