breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
संजय राऊत यांनी कमी बोलावं अशीच आमची अपेक्षा : आशिष शेलार
मुंबई | भाजप नेते आशिष शेलार यांनी आज लीलावती रुग्णालयात जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्याच्या राजकीय तणातणीत भाजप आणि शिवसेनेमधील संबंध ताणले आहेत. अशा परिस्थितीत भाजपचे बडे नेते असलेले आशिष शेलार हे संजय राऊत यांच्या भेटीला गेल्याने, चर्चेला उधाण आलं.
आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केलीच, शिवाय दोघांनी विशेष कक्षात जाऊन दहा मिनिटे चर्चाही केली. सध्या शिवसेना सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. राज्यपालांना भेटून शिवसेनेने वेळही वाढवून मागितला आहे. मात्र राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने सेनेची कोंडी झाली आहे.