ताज्या घडामोडीपुणे

पुणे विद्यापीठाच्या प्रा.शांतिश्री पंडित जेएनयूच्या कुलगुरूपदी ; जेएनयुच्या पहिल्या महिला कुलगुरू

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक शांतिश्री धुलीपुडी पंडित यांची जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्लीच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शांतिश्री पंडित जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू ठरल्या आहेत. 59 वर्षांच्या असलेल्या पंडित यांची शिक्षण मंत्रालयाच्या वतीने पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.शांतिश्री पंडित ह्या जेएनयुच्या माझी विद्यार्थी आहेत, त्यांनी जेएनयुमधून आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात एमफिल आणि पीएचडी केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंडित यांची नियुक्तीवर शिक्कामोर्तब केला आहे. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल असे शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

शांतिश्री पंडित यांनी 1988 मध्ये गोवा विद्यापीठातून आपल्या अध्यापनाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि 1993 मध्ये ते पुणे विद्यापीठात आल्या. त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशासकीय पदावर काम केले आहे. त्या विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च (ICSSR) च्या सदस्या राहिल्या आहेत. तसेच, त्यांनी आपल्या कारकिर्दीत 29 पीएचडीसाठी मार्गदर्शन केले आहे.

दरम्यान, जेएनयूमध्ये प्रभारी कुलगुरू असणारे एम जगदेश कुमार यांची गेल्या आठवड्यात यूजीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button