TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

खंडणी विरोधी पथकाची कारवाईः महाविद्यालयीन तरुणांना उत्तेजक इंजेक्शन आणि गांजा विकणाऱ्या युवकास पिंपरीत अटक

पिंपरी

महाविद्यालयीन तरुणांना उत्तेजक इंजेक्शन आणि गांजा विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी पिंपरीतून अटक केली. त्याच्याकडून ६४२ ग्रॅम गांजा आणि मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या ९५ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. खंडणी विरोधी पथकाने ही कामगिरी केली. रवी चंद्रकांत थापा (३२, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथक पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वायसीएम रुग्णालयासमोर गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी संशयितपणे थांबल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये १६ हजार ५० रुपये किमतीचा ६४२ ग्रॅम गांजा आणि २५ हजार ४६० रुपये किमतीच्या मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या ९५ बाटल्या मिळून आल्या. तसेच, आरोपीकडून दोन हजार रुपये रोख रकमेसह एकूण ४३ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहायक निरीक्षक उद्धव खाडे, सहायक फौजदार अशोक दुधवणे, पोलिस अंमलदार रमेश गायकवाड, निशांत काळे, विजय नलगे, किरण काटकर, सुनील कानगुडे, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button