breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

“शरद रयत चषक ” स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ; अध्यक्ष शरद पवार यांची राहणार उपस्थिती

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

“शरद रयत चषक” राज्यस्तरीय महाविद्यालयीन विद्यार्थी ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा व निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला आहे. रयतच्या पश्चिम विभागाचे चेअरमन अॅड. राम कांडगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रयत शिक्षण संस्था, पश्चिम विभाग, औध, पुणे यांचे विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लोकनेते पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त शरद रयत चषक राज्यस्तरीय महाविद्यालयीन विद्यार्थी ऑनलाइन वक्तृत्व व राज्यस्तरीय माध्यमिक विद्यालय निबंध स्पर्धा दि.२२ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या.

वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे संध्याकाळी चार वाजता या दोन्हीही स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ आदरणीय पवार साहेब यांचे शुभहस्ते समारंभ संपन्न होणार आहे. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार विश्वजित कदम, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

मा. खासदार शरद पवार यांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, क्रीडा इत्यादी उल्लेखनीय योगदान आहे. आजच्या आधुनिक युगात त्यांचे कार्यकर्तुत्व समाजातील सर्वाना प्रेरणा देणारे असून आजच्या तरुणाईला व कृषी क्षेत्राला दिशा देणारे आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पवार साहेबांचे व्यक्तिमत्व जाणून घेता यावे, त्यांनी साहेबांचे कार्य माहीत करून घ्यावे, त्यावर चिंतन करावे आणि आपली विधायक मते परखडपणे व्यक्त करावीत या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. “देशाच्या दुसऱ्या हरितक्रांतीचे प्रणेते लोकनेते पद्मविभूषण खासदार शरदरावजी पवारसाहेब” हा विषय स्पर्धेसाठी देण्यात आला होता.

ही स्पर्धा संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. महाविद्यालयीन स्तरावरील या स्पर्धेत प्रथम फेरीत महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यातून ६७० स्पर्धेकांनी यामध्ये सहभाग घेतला. यामध्ये मुलीचा सहभाग ७५% एवढा उल्लेखनीय होता. प्रथम फेरीतून सुपर ८१ स्पर्धकांची निवड करण्यात आली. माध्यमिक स्तरावरील निबंध स्पर्धेस ३१९५६ मुला-मुलींनी भाग घेतला. या स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे मुलांपेक्षा मुलींचा सहभाग १८७४९ इतका विक्रमी आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यातील मुला-मुलींनी भाग घेतलेला आहे. या स्पर्धेत “शरद रयत चषकाचे” मानकरी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्घम भागातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासलेल्या मुलींचा संघ ठरलेला आहे. या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमास जास्तीत जास्त बंधू भगिनींनी प्रत्यक्ष हजार रहावे. तसेच सदर कार्यक्रम संपर्क माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने सादर होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button