TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हरघर तिरंगा मोहीम – माजी महापौर राहुल जाधव

चिखली, जाधववाडी, कुदळवाडी, मोशी भागामध्ये राहुल जाधव यांच्या वतीने मोफत तिरंगा ध्वज वाटप

पिंपरी | भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हरघर तिरंगा मोहिमे अंतर्गत माजी महापौर राहुल जाधव यांच्या वतीने चिखली, जाधववाडी, कुदळवाडी, मोशी भागमध्ये नागरिकांना मोफत तिरंगा ध्वज वाटप करण्यात येत आहे.

यावेळी बोलताना राहुल जाधव पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हरघर तिरंगा मोहिमेमुळे येणाऱ्या पिढीमध्ये राष्ट्राभीमान जागृत होण्यासाठी मदत होईल. तसेच भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या राष्ट्रभक्तांनी बलिदान दिले त्या सर्व हुतात्म्यांचे बलिदान व त्यांचा इतिहास हा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. या निमित्ताने सर्व नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखून दिनांक १३.०८.२०२२ ते १५.०५.२०२२ या कालावधी मध्ये हरघर तिरंगा उपक्रम सर्वांनी राबवावा.

तसेच नागरिकांसाठी मोफत तिरंगा ध्वज राहुल जाधव यांच्या कार्यालयामध्ये तसेच आमदार महेशदादा लांडगे यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button