breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राजकीय दबावापोटी आयुक्तांची महिला कर्मचा-यावर निलंबनाची कारवाई

सत्ताधारी व विरोधी पक्षातील पदाधिका-यांच्या रडार कर्मचारी

पिंपरी ( महा ई न्यूज )-  महापालिकेच्या ई प्रभाग कार्यालयात कार्यरत असलेली मीटर निरीक्षक शितल चतुर्वेदी यांची सत्ताधारी व विरोधी पक्षातील पदाधिका-यांच्या दबावामुळे चुकीच्या पध्दतीने बदली करण्यात आली. त्याबाबत तक्रार करून देखील प्रशासन व महापालिका आयुक्तांनी त्याची दखल घेतली नाही. तक्रारीकडे दुर्लक्ष करून उलट राजकीय दबावामुळे या महिलेवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

शितल चतुर्वेदी यांची ई प्रभागातून फ प्रभागात ८ जून २०१८ रोजी बदली झाली होती. मात्र, ही बदली चुकीच्या पध्दतीने झाल्याची तक्रार शितल चतुर्वेदी यांनी पुराव्यानिशी महापालिका आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीवर प्रशासनाकडून कार्यवाही होणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतर चतुर्वेदी यांच्यावर राजकीय मंडळींनी खोटे आरोप केले. दरम्यान, महापालिकेच्या एका उच्चपदस्थ पदाधिका-यांच्या दबावामुळे आयुक्त व प्रशासनाने चतुर्वेदी यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून आयुक्तांनी कर्मचारी महिलेवर निलंबनाची कारवाई केली आहे.

निलंबनाची कारवाई करताना तक्रारींचा हवाला न देता प्रशासनाने वरिष्ठांचा चुकीचा आदेश न पाळल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. आयुक्त हर्डीकर व प्रशासाने कर्मचारी महिलेच्या चुकीच्या पध्दतीने झालेल्या बदलीवर संबधित सहशहर अभियंता आय्युब खान पठाण यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता त्यांनी पठाण यांनीच दिलेल्या अहवालावर चतुर्वेदी यांच्यावर कारवाई केली आहे. पठाण यांनी अधिकार नसताना बदली गेली. त्याला आयुक्तांनी केवळ राजकीय दबावामुळे मुकसंमती दिल्याचे दिसून येत आहे. या प्रकारानंतर चतुर्वेदी यांनी कर्मचारी महासंघाकडे तक्रार केली असून महिला आयोग व न्यायालयाकडे धाव घेण्याची तयारी केली आहे. या बाबत आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

आयुक्तांना कारवाईची ऐवढी घाई का ?

या प्रकरणात आणखी एक आश्चर्याची बाब पुढे आली असून निलंबानाची कारवाई होईपर्यंत या प्रकरणाची प्रशासनातील अधिका-यांनाही खास माहिती नव्हती. आयुक्तांनीच ही फाईल मागवून कारवाईचे आदेश काढले. दरम्यान, आयुक्तांना कारवाईची ऐवढी घाई का ? याचा मागोवा घेतला असता एक पदाधिका-याने राजीनामा देण्यापूर्वी ही कारवाई आयुक्तांकडून जातीने करून घेतल्याची चर्चा सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button