पिंपरी / चिंचवड

पुण्यात घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेवर दबाव : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी l प्रतिनिधी

पती आणि त्याच्या नातेवाईकांनी विवाहितेला माहेरहून पुण्यात घर घेण्यासाठी पैसे आणण्याची मागणी केली. त्या कारणावरून तिचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 23 डिसेंबर 2020 ते 11 फेब्रुवारी 2022 या कालावधीत उमरगा, जि. नांदेड आणि मोरवाडी पिंपरी येथे घडली.

बालाजी माधव नाईकवाडे, माधव नाईकवाडे (दोघे रा. उमरगा, ता. कंधार, जि. नांदेड), बाळू डांगे (रा. लातूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मयत विवाहितेचा भाऊ नंदकुमार गंगाधर बोरूळकर (वय 30, रा. लातूर) यांनी 13 एप्रिल रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत आरोपींनी फिर्यादी यांच्या बहिणीला मानसिक त्रास दिला. शिवीगाळ करून ‘माहेरहून पैसे कसे घेऊन येत नाही तेच पाहतो’ अशी धमकी दिली. तिला क्रूरपणे वागणूक दिली. तसेच फिर्यादी यांच्या वडिलांना देखील पैसे देण्यासाठी दबाव टाकून शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादी यांच्या बहिणीने राहत्या घरात गळफास लाऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button