पिंपरी / चिंचवड

‘मावशी तुम्हाला कुणीतरी बोलावत आहे’ असे म्हणून पळवले दागिने आणि पैसे

पिंपरी l प्रतिनिधी

भोसरी येथे एका महिलेला ‘मावशी तुम्हाला कोणीतरी बोलावत आहे’ असे म्हणून आवाज देत तिच्याकडील दागिने आणि रोख्र रक्कम पाहण्यासाठी घेऊन ती लंपास केली. ही घटना मंगळवारी (दि. 12) सायंकाळी पावणे सहा वजता घडली.

याप्रकरणी पिडीत महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अज्ञात व्यक्तीने ‘मावशी तुम्हाला कोणीतरी बोलावत आहे’ असे सांगून त्याच्या पाठीमागे येण्यास सांगितले. काही अंतर गेल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या गळ्यातील 45 हजारांचे दागिने आणि 800 रुपये रोख रक्कम मला दाखवा, परत देतो असे म्हणून घेतले आणि फसवणूक करून अज्ञात व्यक्ती निघून गेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button