breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल’, ‘त्या’ प्रकरणावरून मुनगंटीवार आक्रमक

मुंबई – जळगावातील आशादीप महिला शासकीय वसतिगृहातील महिला आणि मुलींना निर्वस्त्र होऊन डान्स करण्यास सांगितले असल्याचा आरोप केला जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत भाजपने देखील हा मुद्दा उपस्थित करत आरोपी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वाचा :-पूजा चव्हाण प्रकरणात नवं वळण; मोबाईल आणि लॅपटाॅप भाजप नेत्यानं चोरला?

भाजप आमदार श्वेता महाले यांनी विधासभेत हा मुद्दा उपस्थित केला. ‘आपण अभिमानाने सांगतो की हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, सावित्रीच्या लेकी आहेत. मात्र पोलिसांकडूनच महिलेंची दयनीय अवस्था केली जात आहे. या घटनेतील आरोपी पोलिसांवर कारवाई करत त्यांचे निलंबन करावे’, अशी मागणी आमदार महाले यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली.

 

ज्यांच्यावर राज्यातील महिलांचे, मुलींचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांच्या समोरच आज राज्यातील आई बहिणींच्या इज्जतीचे धिंडोरे निघत आहे. महाविकास आघाडी सरकार चौकशीचे ढोंग आहे, असा आरोप देखील महाले यांनी केला.

महाले यांना हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘नोंद घेऊ’ एवढेच उत्तर दिले. गृहमंत्र्यांच्या त्रोटक उत्तराने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील आक्रमक भूमिका घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल, असा थेट इशारा दिला. माझ्या आई-बहिणीला नग्न करून, कपडे काढून नाचायला लावले जात आहे आणि आम्ही नोंद घेऊ म्हणता. हे मृत मनाचे आमदार आहेत का ? तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे. काय कारवाई करणार हे सांगितले पाहिजे, मात्र तुम्ही केवळ नोंद घेऊ म्हणता, अशी जोरदार टीका मुनगंटीवार यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button