breaking-newsमनोरंजन

रणवीरसोबतच्या पहिल्या भेटीविषयी दीपिका सांगते…

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. २०१८ रोजी या दोघांनी इटलीमध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांचा विवाहसोहळा चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. त्यांच्या लग्नाप्रमाणेच त्याच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यातच या दोघांमधील केमिस्ट्री पाहता त्यांच्या लव्हस्टोरीची नेमकी सुरुवात कशी झाली हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांसोबतच कलाविश्वातील काही जण उत्सुक असल्याचं दिसून येतं. मात्र या साऱ्यांच्या उत्सुकता अधिक काळ न ताणता दीपिकाने एका चॅट शोमध्ये त्यांची लव्हस्टोरी शेअर केली.

एका मुलाखतीमध्ये दीपिकाने स्वत: रणवीरसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला आहे. “आम्ही पहिल्यांदा सिंगापूरमध्ये एका अवॉर्ड फंक्शनमध्ये भेटलो होतो. त्यानंतर आमची दुसरी भेट यशराज स्टुडिओमध्ये सुरु असलेल्या चित्रीकरणादरम्यान झाली. या भेटीवेळी आम्ही पहिल्यांदा एकमेकांशी बोललो. मी यशराज स्टुडिओमध्ये शूटिंग करत होते. त्यावेळी रणवीरही तेथे आला होता. विशेष म्हणजे रणवीर त्यावेळी अन्य एका मुलीला डेट करत असतानाही माझ्याशी फ्लर्ट करत होता. बराच काळ गेल्यानंतर न राहावून मी त्याला तू माझ्याशी फ्लर्ट करत आहेस का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने अजिबात नाही, असं उत्तर त्याने दिलं. त्याचं हे उत्तर ऐकून मी ठामपणे तू माझ्याशी फ्लर्ट करत आहेस”, असं सांगितलं.

पुढे ती म्हणाली, “या भेटीनंतर आम्ही परत एकदा भन्साळी यांच्या घरी भेटलो. त्यांनी रामलीला चित्रपटाच्यावेळी आम्हाला जेवायला बोलावलं होतं. यावेळी आमच्यामधेयो बऱ्याच गप्पा झाल्या. तेव्हा तो असा काळ होता, जेव्हा मला रणवीर खूप स्पेशल वाटू लागला होता”.

दरम्यान, ‘रामलीला’नंतर दीप-वीर बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र झळकले होते. विशेष म्हणजे अनेक वेळा त्यांची भेट केवळ भन्साळींमुळेच झाली. त्यानंतर दीप-वीरने जवळपास ६ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८मध्ये लग्नगाठ बांधली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button