breaking-newsमहाराष्ट्र

औरंगाबाद हिंसाचाराप्रकरणी शिवसेना नगरसेवकाला अटक

औरंगाबाद : औरंगाबादमधील हिंसाचाराप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना पोलिसांनी अटक केली आहे. हिंसाचारातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजेंद्र जंजाळ हे तिथे उपस्थित असल्याने ही कारवाई केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. शिवसेना नगरसेवकाला अटक होताच शिवसैनिकांनी क्रांती चौक पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली.

औरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री तीन- चार किरकोळ घटनांचे पर्यवसन दोन गटातील हाणामारीपर्यंत गेले आणि शहरात हिंसाचार झाला होता. मोती कारंजा भागातून सुरु झालेला हा हिंसाचार जुन्या शहरात पसरला. दुकाने आणि वाहनांना आगी लावण्याचे प्रकार पहाटेपर्यंत सुरु होते. या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला. तर ५१ हून अधिक जखमी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button