ताज्या घडामोडीराष्ट्रिय

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की नरमले; नाटोचा सदस्य आग्रह सोडला म्हणाले

कीव | नाटो युक्रेनला सदस्य म्हणून स्वीकारण्यास तयार नाही. आम्हाला ते आता समजले. यामुळे मी आवाक् झालोय. म्हणून आता आपण नाटोच्या सदस्यत्वासाठी आग्रह धरणार नाही. कोणावर दबाव आणणार नाही, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सोमवारी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. झेलेन्स्की यांनी पहिल्यांदाच अशी नरमाईची भूमिका घेत रशियासोबत चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले.

नाटोचे सदस्यत्व ही अतिशय नाजूक गोष्ट आहे. त्यामुळे रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. मात्र नाटोही युक्रेनला स्वीकारण्यास तयार नाही. रशिया नाटोच्या विरोधात आहे. या प्रकारामुळे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पहिल्यांदा नरमाईची भूमिका घेतली. आपण नाटोच्या वादग्रस्त भूमिकेला आणि रशियासोबतच्या संघर्षाला घाबरत नाही, असे म्हटले आहे. जे गुडघ्यावर बसून कशाची तरी भीक मागतात, अशा देशाचे राष्ट्राध्यक्षही मी होऊ इच्छित नाही, असे त्यांनी मुलाखतीत म्हटले. रशियापासून युरोपला वाचवण्यासाठी नाटो तयार झाला. त्याचे सदस्यत्व मिळवण्यासाठी यूक्रेनने दबाव तंत्र वापरले. त्यावरून रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला. असे असताना झेलेन्स्की यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button