breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

सरकारचा मोठा निणर्य! लक्षद्वीपला जाण्यासाठी फ्लाईट होणार सुरु

Lakshadweep| सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपचे फोटो शेअर केल्यानंतर एकच मुद्दा चर्चेत आला आहे. एकीकडे लक्षद्वीपला पसंती दिली जातेय यामुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे, आता लक्षद्वीपला जाण्यासाठी विमानांची सुविधा आणखी चांगली होणार आहे. स्पाईसजेट लवकरच लक्षद्वीपसाठी विमानसेवा सुरु करणार आहे.

बजेट एअरलाइन्स स्पाइसजेटचे एमडी अजय सिंग यांनी बुधवारी झालेल्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) सांगितले की, कंपनीकडे लक्षद्वीपला उड्डाणे सुरू करण्याचे विशेष अधिकार आहेत. या भारतीय पर्यटन स्थळासाठी आगत्ती बेटावर एकमेव एअरफील्ड आहे, पण इथेही सर्व प्रकारची विमाने उतरू शकत नाहीत. सध्या विमानतळावरील उड्डाणे कोचीमार्गे जातात.

हेही वाचा   –   डेव्हिड वॉर्नरची क्रिकेटच्या मैदानात हेलिकॉप्टरमधून एन्ट्री; व्हिडीओ व्हायरल..

मात्र आता भारत आणि मालदीवमध्ये सुरू असलेल्या राजनैतिक वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लक्षद्वीपबाबतही मोठी योजना आखली आहे. आता लक्षद्वीपमध्ये आणखी एक विमानतळ बांधण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांना लक्षद्वीपला जाणे सोपे होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button