breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

“कोण रोहित पवार? ते अजुन मॅच्युअर नाहीत”; प्रणिती शिंदेंची टीका

महिला आमदारावर हल्ले होत असतील, तर सामान्य महिलांचं काय होत असेल?

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे दोन दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सोलापूर लोकसभा जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे द्यावी अशी मागणी केली होती. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली आहे.

आमदार रोहित पवार यांच्या या मागणीवरून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोण रोहित पवार? रोहित पवार अजुन मॅच्युअर नाहीत. त्यांची आमदारकीची पहिली टर्म आहे. त्यामुळे पोरकटपणा असतो काही जणांच्यामध्ये, अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली आहे.

आमच्या नेत्यांवर वारंवार शाब्दिक आणा आता फिजीकल हल्ले होत आहेत. या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. आज एका महिला आमदारांवर ज्याप्रकारे हल्ला झाला त्याच्या मागचं कारण पुढे आलं पाहिजे. जर एक महिला आमदारावर असे हल्ले होत असतील, तर सामान्य महिलांचं काय होत असेल? असा प्रश्नही प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.

अदाणी प्रकरणावर बोलताना त्या म्हणाल्या की, राहुल गांधींनी संसदेत बोलताना, तथ्यांच्या आधारे भाषण केलं. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. ते सध्या अस्वस्थ आहेत. ज्या प्रमाणे त्यांनी राहुल गांधींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं, यावरून त्यांच्यावर राहुल गांधींच्या भाषणाचा किती परिणाम झाला आहे, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button