breaking-newsविदर्भ

नागपूर जिल्हा परिषद मुख्यालय आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय

नागपूर – नागपूर जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याने आज २४ ऑगस्टपासून ३० ऑगस्टपर्यंत म्हणजेच तब्बल आठवडाभर हे मुख्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात काल जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक पार पडली.

या बैठकीला उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत या मुख्यालयातील दोन विभागातील १८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या मुख्यालयातील सर्व विभागाचे कामकाज आठवड्याभरासाठी बंद ठेवले जाणार आहे.

या बंद कालावधीत बांधकाम विभागाकडून या मुख्यालयाचे संपूर्ण निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कपातसुद्धा केली जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button