breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

‘देवेंद्र फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये’

मुंबई – अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारला घेरले होते. यावेळी फडणवीसांनी अनेक माहिती उपलब्ध करत थेट सचिन वाझेंवर गंभीर आरोप केले होते. फडणवीसंनी सीडीआर (कॉल रेकॉर्ड डिटेल्स) च्या आधारे सचिन वाझे यांच्यावर आरोप केले होते. मात्र आता या सीडीआरवरून काँग्रेसने फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

वाचा :-‘वाझे अंबानींकडून हप्ते वसुलीसाठी प्रयत्न करत होता’, भाजप आमदाराचा दावा

देवेंद्र फडणवीस यांनी CDR ची माहिती तपास यंत्रणांकडे द्यावी व गुन्हेगारांना शासन करण्यास मदत करावी. नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणे त्यांचे कर्तव्य आहे. CDR मिळवणे हा गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रांचने CDR रॅकेट उघडकीस आणले होते, असे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

सर्वसामान्यांना एक न्याय व नेत्यांना दुसरा न्याय योग्य नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. विधिमंडळात मोठ्या आवाजात प्रश्न दबता कामा नये. स्वतः मुख्यमंत्री राहिलेले विरोधी पक्षनेते याचा निश्चित विचार करतील हा विश्वास आहे, असेही सावंत म्हणाले.

तसेच, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या १५ मार्चच्या निर्णयाने आरोपीची खाजगी माहिती तिसऱ्या व्यक्तीला देणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल. देवेंद्र फडणवीसजी मिळालेल्या CDRचा स्त्रोत न सांगून व CDR स्वतः कडे ठेवून, ते २ आरोपींना पाठीशी घालत आहेत‌. त्यांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये, असा विनंती वजा सल्ला देखील सावंतांनी फडणवीसांना केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button