पिंपरी / चिंचवड

घरात एकट्या असलेल्या बारा वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य

पिंपरी येथील प्रकार

पिंपरी l प्रतिनिधी

बारा वर्षीय मुलीसोबत 34 वर्षीय व्यक्तीने अश्लील चाळे केले. त्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार 25 जानेवारी रोजी दुपारी लिंकरोड़, पिंपरी येथे घडला. याबाबत 16 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खालीद इकबाल शेख (वय 34, रा. पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आजीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 12 वर्षीय नात घरात एकटी असताना आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन केले. या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. काही दिवसानंतर हा प्रकार घरच्यांच्या लक्षात आल्याने याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शशांक कदम तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button