breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘चांगल खेळता येत नसलं की चिडायंच’, रोहीत पवार यांची टीका

पुणे |महाईन्यूज |प्रतिनिधी|

लहानपणी क्रिकेट खेळताना एखादा चांगला खेळत असेल तर लगेच एखादा चिडका मुलगा यायचा. माझी बॅट, माझा बॉल म्हणून चिडून बॅट-बॉल घेवून जायचा. तसेच हे ‘ईडी’चं प्रकरण चालू असल्याचा संशय येतो. चांगल खेळता येत नसलं की चिडायचं अश्या शब्दांत शरद पवार यांचे नातु रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा शरद पवार, अजित पवार यांच्यासह अन्य ७० जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या आरोपासह मंगळवारी ईडीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार यांच्यासह अन्य ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शरद पवारांवर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर पवारांचे नातु रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर वरून भाजपावर टीका केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button