breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

“पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट” : आमदार लांडगेंकडून नगरसेवक रवि लांडगे, नाना काटे यांना वाढदिनी शुभेच्छा!

नगरसेवक लांडगे, काटे यांना वाढदिनी दिल्या शुभेच्छा

राजकीय जोडे बाजूला ठेवून जपला राजकीय सुसंस्कृतपणा

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी भाजपातील बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांना वाढदिवसानिमित्त “सोशल मीडिया”द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपा आहे. तर विरोधी पक्षात राष्ट्रवादी आहे. मात्र, राजकीय जोडे बाजूला ठेवून राजकीय सुसंस्कृतपणा जपला पाहिजे, या हेतूने आमदार लांडगे यांनी “पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट” ही चळवळ हाती घेतली. त्याद्वारे राजकीय मतभेद आणि विचारधारा वेगळी असली, तरी सुख-दु:खात एकमेकांसोबत राहिले पाहिजे, असा आदर्श घालून दिला आहे.
१५ ऑगस्ट म्हणजे स्वांतत्र्य दिनी भाजपा नगरसेवक रवि लांडगे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांचा वाढदिवस असतो. दरम्यान, रवि लांडगे हे स्थानिक नेते अर्थात आमदार लांडगे यांच्यावर नाराज आहेत. किंबहूना रवि राष्ट्रवादीच्या वाटेवार आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या रवि यांना महापालिकेतील मानाचे पद न मिळाल्यामुळे भोसरीत राजकीय भूकंप होणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या सर्व वातावरणाही आमदार लांडगे यांनी लांडगे यांनी राजकीय सुसंस्कृतपणा जपल्याचे पहायला मिळाले.
https://www.facebook.com/394208647274977/posts/4769150346447430/

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनाही आमदार लांडगे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमधील उच्चभ्रू लोकांचा परिसर असलेल्या पिंपळे सौदागरमधून काटे गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रवादीचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्त काटे आणि लांडगे एकमेकांना राजकीय जोडे बाजूला ठेवून शुभेच्छा देत असतात, असे सांगितले जाते.

https://www.facebook.com/394208647274977/posts/4768910529804745/
माजी आमदारांचे संकुचित राजकारण…
रवि लांडगे यांना बिनविरोध निवडून देण्याचे श्रेय माजी आमदार विलास लांडे घेत असतात. त्याचा राजकीय फायदाही मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, माजी आमदार लांडे, नगरसेवक अजित गव्हाणे आणि विक्रांत लांडे या तिघांपैकी एकाच्याही सोशल मीडिया अकाउंटवर दुपारी १२.३० पर्यंत रवि लांडगे यांच्या वाढदिवस शुभेच्छांची पोस्ट झळकली नाही. तसेच, स्वपक्षाचे आघाडीचे स्थानिक नेते असतानाही नाना काटे आणि विद्यमान विरोधी पक्षनेते राजू मिसाळ (दि.८ ऑगस्ट)यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या दिसत नाहीत. सोशल मीडियावर संपूर्ण पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सतर्क असलेले माजी आमदार लांडे यांना स्वपक्षाच्या नगरसेवकांना शुभेच्छा देता आल्या नाहीत. सार्वजनिक जीवनात वावरत असताना लांडे यांची ही भूमिका संकुचित राजकारणाचे लक्षण आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button