breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करून दाखवाच’; मनसेचा बॉलिवूडला इशारा

मुंबई | भारतात पाकिस्तानी कलाकारांना अघोषित बंदी असतानाही अतिफ अस्लम सात वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सनेने बॉलिवूडच्या या निर्णयाला विरोध केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बॉलिवूडला इशारा दिला आहे.

अमेय खोपकर यांनी म्हटलं की, अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत. विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल. पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव आहे, पण तरीही सांगतोच.

हेही वाचा    –    पेपर फोडल्यास १० वर्षांचा तुरुंगवास आणि १ कोटी रुपयांचा दंड!

पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची भूमिका होती, आहे आणि पुढेही राहणार. फक्त बॉलीवूडच नाही तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच. हे चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत कुणी करु नये, एवढाच सल्ला आत्ता देतोय, असं अमेय खोपकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button