आगामी लोकसभा निवडणुकीत कोण ठरणार वरचढ? वाचा सविस्तर..
![Who will emerge victorious in the upcoming Lok Sabha elections?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/rahul-gandhi-and-narendra-modi-780x470.jpg)
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकींसाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. इंडिया आणि एनडीए यांच्यात यंदा कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे आणि सी वोटरने केलेल्या मूड ऑफ नेशनच्या सर्वेतही वेगळा अहवाल प्राप्त झाला आहे.
मूड ऑफ द नेशनच्या पोलनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला ३०६ जागा सहज मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला १९३, तर इतर राजकीय पक्षांना ४४ जागा मिळतील असा अंदाज आहे.
हेही वाचा – Chandrayaan-3 : ‘चांद्रयान-३’चं लँडिंग कसं झालं, पाहा व्हिडीओ..
आज सार्वत्रिक निवडणुका झाल्यास एनडीएला एकूण ४३ टक्के मते तर इंडिया आघाडीला ४१ टक्के मते मिळतील असंही मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणातत म्हटलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला २८ तर महायुती (भाजपा+शिंदे गट+अजित पवार गट) ला २० जागा मिळतील, असं या सर्वेतुन समोर आलं आहे.
एनडीए आघाडीवर असला तरी भाजपा २८७ जागांवर विजयी होईल, तर काँग्रेस अवघ्या ७४ जागांवर विजयी होईल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३०३ जागा मिळाल्या होत्या. मात्र या पोलनुसार भाजपाच्या जागा घटण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणासाठी सर्व राज्यांमध्ये २५ हजार ९५१ लोकांशी संवाद साधण्यात आला. तसंच, नियमित ट्रॅकर डेटाव्यतिरिक्त १ लाख ३४ हजार ४८७ मतदारांच्या मुलाखती घेऊन हा अहवाल काढण्यात आला आहे.