breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेश

Chandrayaan-3 : ‘चांद्रयान-३’चं लँडिंग कसं झालं, पाहा व्हिडीओ..

Chandrayaan-3 : भारताच्या ‘चांद्रयान-३’चं २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर झालं. यासह भारताचं मिशन चांद्रयान यशस्वी ठरलं. यानंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच संपुर्ण जगाने कैतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. दरम्यान, इस्त्रोने ‘चांद्रयान-३’चं लँडिंग कसं झालं याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

‘चांद्रयान-३’ चंद्रावर उतरतानाचा व्हीडिओ इस्रोने ट्विट केला आहे. या व्हीडिओत शेवटच्या ५ ते ७ सेकंदांचा हा सर्व थरार पाहायला मिळतोय. ‘चांद्रयान-३’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर शेवटच्या काही सेकंदात यशस्वीरित्या उतरवण्याचं आव्हान होतं. त्याच आव्हानात्मक क्षणाचा व्हीडिओ इस्रोने ट्विट केला आहे.

हेही वाचा – गुहावाटीला जाण्यामुळे काय मिळाले? बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, ‘चांद्रयान-३’ मोहीमेनंतर सूर्य मोहिम ‘आदित्य-एल१’ उपग्रह सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रक्षेपित केला जाईल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली. हे मिशन साधारण १२० दिवसांचे म्हणजेच ४ महिन्यांचे असेल. या कालावधीत उपग्रह १५ लाख किमी अंतर कापून सूर्याच्या कक्षेत पोहोचणार आहे. तेथील सौर वातावरणाचा अभ्यास करत माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button