Waqf Amendment Bill: ‘वक्फ मालमत्तेचा वापर गरीब मुस्लीमांसाठी व्हावा’: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू
वक्फ विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला (ठाकरे) डिवचले

नवी दिल्ली: वक्फ विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आहे. मात्र विरोधी पक्षाच्या वतीने विधेयकाविरोधात पॉईंट ऑफ ऑर्डरचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मंत्रिमंडळाने संमती दिल्यानंतर सभागृहात विधेयक मांडले गेले. सभागृहाने संयुक्त संसदीय समितीकडे विधेयक पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार समितीकडे विधेयक पाठवले. समितीने दिलेल्या शिफारशींना मान्यता दिली आणि त्यानंतर आता पुन्हा विधेयक मांडले जात आहे. हे सर्व संसदीय मार्गाने होत आहे. हा काही काँग्रेसचा काळ नाही. त्यांच्या काळात समित्या केवळ शिक्का मारत होत्या. आम्ही स्थापन केलेल्या समितीने स्वतःचा विचार मांडला आहे. Waqf Amendment Bill
‘वक्फ मालमत्तेचा वापर गरीब मुस्लीमांसाठी व्हावा’: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू
देशभरात वक्फशी निगडित ३० हजार प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. तसेच जगातील सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाकडे आहे. तरीही मुस्लीम गरीब का आहेत? असा सवाल अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी उपस्थित केला. या मालमत्तांचा वापर गरीब मुस्लीमांसाठी व्हायला हवा होता, असेही ते म्हणाले. Waqf Amendment Bill
देशात अशांततेचे वातावरण’, काँग्रेस खासदाराने व्यक्त केली भीती
संयुक्त संसदीय समितीकडे वक्फ विधेयक पाठविल्यानंतर तिथेच त्यावर सखोल चर्चा होणे आवश्यक होते. मात्र सत्ताधाऱ्यांनी तशी चर्चा होऊ दिली नाही. अल्पसंख्याक समुदायाबाबत सरकार असा कायदा आणत आहे, ज्यामुळे देशात अशांततेचे वातावरण तयार होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी दिली. Waqf Amendment Bill
वक्फ कायद्यात ब्रिटिश काळापासून बदल होत आले – किरेन रिजिजू
वक्फशी निगडित मालमत्तांचे नियमन करण्यासाठी हा पहिल्यांदा बदल होत नाही आहे. ब्रिटिश काळापासून वक्फशी निगडित मालमत्तांबाबत कायदे होत आले आहेत, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. Waqf Amendment Bill
“वक्फ विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, हे केवळ..”, किरेन रिजिजू यांची स्पष्टोक्ती
ज्ञानव्यापी आणि संभल मशिदीच्या विरोधात न्यायालयीन खटला चालविणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी सांगितले की, वक्फला अमर्यादित अधिकार दिले होते. या विधेयकाच्या माध्यमातून वक्फच्या व्याख्येत बदल करण्यात येत आहे. तसेच वक्फच्या समितीमध्ये इस्लामचे ज्ञान असणाऱ्यांना घेतले जाणार आहे. यात अनेक बदल केले असले तरी आणखी सुधारणा होणे आवश्यक आहे. पुढील काळात ती होईल. Waqf Amendment Bill
हेही वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाबळेश्वर पर्यटन महोत्सव लोगोचे अनावरण
“मुस्लीमांची जमीन हडपण्यासाठीच…”, अबू आझमींची सरकारवर जोरदार टीका
मुस्लीमांची जमीन हडपण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक आणले जात आहे. आज विधेयक मंजूर झाले तर हा दिवस काळा दिवस म्हणून संबोधला जाईल. लोकांनी पुण्य कमविण्यासाठी आपल्या जमिनी वक्फला दान केल्या होत्या, ही सरकारची मालमत्ता नाही. मी ५४३ खासदारांनी विनंती करतो की त्यांनी या विधेयकाचा विरोध करावा.
वक्फ विधेयक ही मुस्लीम समाजासाठी सर्वात मोठी ‘ईदी’, भाजपाच्या मुस्लीम नेत्याचं विधान
उत्तर प्रदेशमधील भाजपाचे नेते मोहसीन रझा यांनी एएनआयशी बोलताना वक्फ विधेयकाला पाठिंबा दिला. ते म्हणाले, या विधेयकामुळे मुस्लीम समुदायातील गरीब, वंचितांचे कल्याण होईल. ज्याप्रमाणे तिहेरी तलाक बंद करून मुस्लीम महिलांना दिलासा मिळाला. त्याप्रमाणेच वक्फ विधेयकाचाही लाभ होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मुस्लीम समुदायाला दिलेली ही सर्वात मोठी ईदी आहे. Waqf Amendment Bill
वक्फ विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला (ठाकरे) डिवचले
वक्फ विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला (ठाकरे) डिवचले. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले जाणार आहे. इंडिया आघाडी या विधेयकाला विरोध करणार आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षही इंडिया आघाडीचा भाग आहे. त्यामुळे त्यांची याबाबत नेमकी भूमिका काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला (ठाकरे) डिवचले आहे. एक्सवर पोस्ट करत ते म्हणाले, “बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?”