Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाईना ठाकरे गटाचं तिकीट, सरदेसाईंविरोधात झिशान सिद्दीकीचं ट्विट

मुंबई | महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला आहे. शिवसेना (ठाकरे गट) त्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने काँग्रेसच्या काही मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंनी वरूण सरदेसाई यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे झिशान सिद्दिकी येथील विद्यमान आमदार आहेत. झिशान सिद्दिकी महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

शिनसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने वांद्रे पूर्वमधून उमेदवार जाहीर केल्यानंतर झिशान सिद्दिकी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, जुन्या मित्रांनी (उद्धव ठाकरे) वांद्रे पूर्व मतदारसंघात त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. यांनी कधीच कोणाची साथ दिली नाही. जो आदर आणि सन्मान देईल त्याच्याबरोबरची नाती सांभाळा, आपापल्या फायद्यांसाठी जमलेल्या गर्दीचा काहीच फायदा नसतो. आता जनता निर्णय घेईल!

हेही वाचा    –     ‘मुख्यमंत्री करा म्हणत ते दारोदारी भटकत आहेत’; एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

दरम्यान, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. या दु:खातून सावरत झिशान सिद्दीकी हे निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. मात्र, मविआने त्यांचं तिकीट कापलं आहे. त्यामुळे झिशान सिद्दीकी आता महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. झिशान सिद्दिकी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय. महावुतीतील कोणत्याही पक्षाने अद्याप वांद्रे पूर्वमधील त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button