Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या ‘या’ नगरसेवकाची प्रकृती चिंताजनक

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रभाग क्रमांक चार दिघी- बोपखेलचे नगरसेवक लक्ष्मण धोंडू उंडे यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर थेरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिघीच्या साई पार्क सोसायटीत उंडे यांचे निवासस्थान आहे. लष्करातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. महापालिका निवडणूक पहिल्यांदाच त्यांनी लढवली आणि निवडून आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली. थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल झाले.

सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, असे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संदीप वाघ यांनी कळविले असल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button