केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतली गिरीश बापट यांची भेट

हेमंत रासनेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मैदानात
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत. कसबा आणि चिंचवडची सध्या पोटनिवडणूक सुरू आहे. यामुळे अमित शहा यांचा हा दौरा महात्वाचा मानला जात आहे. यावेळी त्यांनी भाजप खासदार गिरीश बापट यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.
गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी कसबा पोटनिवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासनेंच्या प्रचारासाठी आले होते. त्यांनी या आजारपणात भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. मात्र अमित शहा यांच्या भेटीने पुणे शहर भाजपमध्ये नाव चैतन्य निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, बापट आजाराशी लढा देत असताना भाजपने त्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी दिली आहे, यावरून विरोधी पक्षाकडून भाजपावर जोरदार टिका केली जात आहे. गिरीश बापट यांची कसबा मतदार संघ आणि पुणे शहरावर मजबूत पकड आहे, त्यामुळे आता बापट मैदानात उतरले आहेत.





