Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘..तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं होणार नाही’; शरद पवार

तुमचे दोन्ही डोळे बंद ठेवले तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं होणार नाही

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते इंदापूरमध्ये एका रूग्णालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमात शरद पवार यांनी त्यांच्या डोळ्यांवर झालेल्या शस्त्रक्रियेचा किस्सा सांगितला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला लगावला.

माझ्या दोन्ही डोळ्यांसंबंधित प्रश्न निर्माण झाला होता, त्यावेळी डॉक्टरांनी मला दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन करायला सांगितले होतं. मी म्हणालो आत्ताच करून टाका, त्यावर डॉक्टर म्हणाले एकदम करता येणार नाही. तुमचे दोन्ही डोळे बंद ठेवले तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं होणार नाही. पण आता डॉक्टरांनी डोळ्यात काय बसवले मला माहित नाही मात्र आता मला व्यवस्थित दिसतंय त्यामुळे कोण काय करतंय हे मला चांगलंच दिसतंय, असं म्हणत शरद पवार यांनी शिंदे गटाला खोचक टोला लगावला.

दरम्यान, शिवसेनेचं चिन्ह आणि नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंदिय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. तो निवडणुक आयोगाचा निकाल आहे, त्यावर चर्चा काही करता येणार नाही, त्यानं फारसा फरक पडणार नाही ते स्वीकारुन नविन चिन्ह घ्यावं लागेल. मागेही कॉंग्रेसचं गाय वासरु चिन्ह होतं नंतर पंजा घेतला. पण त्यामुळे काही फरक पडला नाही. लोकांनी ते स्वीकारलं.. तसा आताही फरक पडणार नाही. काही दिवस चर्चा होत राहील. नंतर लोक विसरुन जातील, असं शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button