Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

‘अयोध्येतील राम मंदिर अपवित्र..’; तृणमूल काँग्रेसच्या नेत्याचं वादग्रस्त विधान

Ramendu Sinha Roy | तृणमूल काँग्रेसचे आमदार रामेंदु सिन्हा यांनी एका सभेत बोलताना राम मंदिर अपवित्र आहे असं म्हटलं आहे. एवढंच नाही तर एकाही हिंदूने तिथे जाऊ नये आणि पूजा करू नये असंही त्यांनी म्हटलं आहे. रामेंदु सिन्हा यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

व्हिडीओमध्ये ते म्हणतात की, मंदिर बांधले गेले आहे आणि कोणत्याही हिंदूने राम मंदिरात पूजा करण्यासाठी जाऊ नये. जर पंतप्रधान मोदी ब्राह्मण नाहीत तर ते प्राणप्रतिष्ठा कसे करू शकतात? टीएमसी आमदाराच्या या वक्तव्यावर सध्या टीएमसीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हेही वाचा     –      खासदार अमोल कोल्हेंची निलेश लंके यांना शरद पवार यांच्यासोबत येण्याची ऑफर 

रामेंदु सिन्हा यांच्या या वक्तव्यावरून भाजपाचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. रामेंदु सिन्हा यांच्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांनी फक्त देशातल्याच नाही तर जगभरातल्या हिंदूंच्या भावना या वक्तव्याने दुखावल्या आहेत. तसंच मी त्यांच्याविरोधात गुन्हाही नोंदवण्यास जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचं वास्तव या वक्तव्यातून समोर आलं आहे. हिंदूंच्या भावना दुखवायच्या, हिंदू देवतांवर टीका करायची इतकी हिंमत त्यांच्यात आली आहे. त्यामुळेच राम मंदिर अपवित्र आहे अशी वक्तव्य करण्याची त्यांची हिंमत होते आहे, असं भाजप नेते सुवेंदु अधिकारी म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button