breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

खासदार अमोल कोल्हेंची निलेश लंके यांना शरद पवार यांच्यासोबत येण्याची ऑफर

पुणे | अजित पवार गटातले आमदार निलेश लंके यांची शरद पवार यांच्यांशी जवळीक वाढू लागल्याची चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याचवेळी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना खुली ऑफर दिली आहे. अहमदनगरला निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने खासदार अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या महानाट्याच्या समारोप कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी आमदार निलेश लंके यांना शरद पवारांसोबत येण्याचं ऑफर दिलीय.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, तुतारी घेऊन नगर दक्षिण मतदार संघात लढण्याचा आवाहन अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना केले आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानीसाठी दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा असा लोकनेता आता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत यावं, असे कोल्हे यांनी म्हटलंय. तर लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षि मध्ये वाजवलीच पाहिजे.

हेही वाचा     –      उन्हाळ्यात AC चा वापर करण्याआधी जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम 

निलेश लंके यांच्या सामाजिक कामाचा मला कायमच अभिमान वाटतो कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातील माणसं जनतेच्या काळजावर अभिराज्य गाजवतात तेव्हा त्यांचा अभिमान सर्वांनाच वाटतो, अशा भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्याय. तर या नाटकाने काय प्रेरणा दिली तर महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तक्ता पुढे झुकत नाही आणि झुकणार नाही, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button