ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

आजपासून नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी, अधिवेशनात २० विधेयक मांडण्यात येणार

नागपूर : आजपासून नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आज सोमवार (१६ डिसेंबर) पासून ते शनिवारी (२१ डिसेंबर) या कालावधीत हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. आज सभागृहात मोठ्या संख्याबळासह पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सत्ताधाऱ्यांच्या बाकावर पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांचे संख्याबळ कमी असले तरी पहिल्याच दिवशी विधिमंडळात खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. आज सभागृहात नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करुन दिला जाणार आहे. त्यासोबतच आज अधिवेशनात काही नवीन विधेयक मांडली जाणार आहे. त्यामुळे फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजणार आहेत.

आज होणाऱ्या अधिवेशनात २० विधेयक मांडण्यात येणार आहेत. कापूस, सोयाबीनचे पडलेले दर, ईव्हीएम या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशन गाजणार आहे. आजपासून सुरु होणारे हिवाळी अधिवेशन महायुती सरकारचे पहिले अधिवेशन असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. या अधिवेशनात सरकार आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनात विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपुरात हिवाळी अधिवेशन होत असल्याने राज्यभरातून नेतेमंडळींसह त्यांचे कुटुंब, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्यासोबत अनेक पाहुणेही दाखल झाले आहेत. त्यामुळे आता पुढील सहा दिवस संपूर्ण शहरात राजकीय चर्चा रंगताना दिसणार आहे. महायुती सरकारच्या स्थापनेनंतर 15 व्या विधानसभेचे नियमित होणारे हे पहिलेच अधिवेशन असेल. या अधिवेशनात लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, कृषी उत्पादनांसाठी हमीभाव, रोजगार आणि इतर अनेक बाबींबर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे. तसेच सरकारकडून यावर काहीतरी ठोस निर्णय घेतले जावे, अशीही अपेक्षा केली जात आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button