Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

To The Point: क्षमता असतानाही भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची उपेक्षाच!

महापौरपदाची पुन्हा हुलकावणी : आमदार शंकर जगताप यांनी ‘काटा काढला’?

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महापालिकेत १२८ पैकी तब्बल ८४ जागांवर भाजपचा दणदणीत विजय, शहराध्यक्ष म्हणून स्वतःच्या पॅनलची दमदार कामगिरी आणि २०१७ मध्ये पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण होणार, असा ठाम विश्वास भाजपा शहराध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या समर्थकांना वाटत होता. मात्र, मात्र राजकीय कुरघोड्यांनी पुन्ह एकदा डाव साधला अन्‌ २०१७ चीच पुनरावृत्ती झाली आणि शहराध्यक्ष काटेंच्या हातून महापौरपद निसटले.

महापौर पद पदरात पडेल, असे चित्र असतानाच ऐनवेळी रवि लांडगे यांची वर्णी लागली आणि शत्रुघ्न काटेंच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच आली. विशेष म्हणजे, दोन्ही वेळा काटेंच्या महापौर स्वप्नात अडथळा ठरले ते आमदार जगताप. क्षमता असतानाही शत्रुघ्न काटे यांना महापालिकेतील महत्त्वाच्या पदापासून वंचित ठेवले जात आहे, अशी खंत काटे समर्थकांकडून बोलून दाखवली जात आहे.

२०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची दशकाहून अधिक काळ असलेली एकहाती सत्ता भाजपने उलथवून टाकली. पहिल्यांदाच ७७ जागांवर विजय मिळवत भाजप सत्तेवर आला. या विजयाचे प्रमुख शिल्पकार होते तत्कालीन आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप. पहिल्यांदाच सत्ता मिळाल्यावर भाजपाचा पहिला महापौर कोण होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष होते. लक्ष्मण जगताप यांचे निकटवर्तीय म्हणून शत्रुघन काटेंचं नाव आघाडीवर होतं. त्यांना आमदार महेश लांडगे यांचाही पाठिंबा होता.
अगदी मुंबईत नरिमन पॉईंटवर महापौरपदाची ‘ग्वाही’ही मिळाली होती. पण शेवटच्या क्षणी राजकारण फिरलं! चिंचवड मतदारसंघात काटे भविष्यात संभाव्य उमेदवार ठरू शकतात, ही बाब लक्ष्मण जगताप यांच्या डोक्यात स्पष्ट होती. राजकीय ताकद वाढू नये, यासाठी शेवटपर्यंत काटेंना झुलवत ठेवलं गेलं आणि अखेर भोसरीच्या नितीन काळजे यांच्या पारड्यात वजन टाकत महापौरपद त्यांना बहाल करण्यात आलं.

‘स्टँडिंग’ पदालाही दूरच ठेवलं!

संपूर्ण सत्ताकाळात स्थायी समिती अध्यक्षपदासाठी प्रयत्न करणाऱ्या शत्रुघन काटेंना ते पदही मिळू दिलं गेलं नाही. खाजगीत तर लक्ष्मण जगताप हे इतकंही बोलायचे की, “काटेंना स्टँडिंग चेअरमन देणं म्हणजे स्टँडिंगचाच अपमान!” स्वतःच्या गटात असूनही काटेंची राजकीय उंची वाढू नये, याची पुरेपूर काळजी घेतली गेली. आता लक्ष्मण जगताप यांच्यानंतर चिंचवडची सूत्रे त्यांचे बंधू आमदार शंकर जगताप यांच्या हाती आली आणि जे लक्ष्मण जगताप यांना वाटत होतं, तेच प्रत्यक्षात घडलं. चिंचवड विधानसभा उमेदवारीसाठी शत्रुघ्न काटेंनी टोकाचा विरोध केला. पण पक्षश्रेष्ठींनी शंकर जगताप यांनाच पसंती दिली. वरून जरी ‘जगताप–काटे’ एकत्र असल्याचं चित्र दिसलं, तरी आतून धुसफूस कायम होती. आमदारकीला केलेला विरोध लक्षात ठेवत, संधी मिळताच शंकर जगताप यांनी काटेंच्या समर्थकांवर कुरघोडी केली आणि महापौरपदाचं स्वप्न दुसऱ्यांदाही अपूर्णच ठेवलं.

८४ जागा, शहराध्यक्ष पद… तरीही महापौरपद नाही!

आता झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने ८४ जागांपर्यंत मजल मारली. शहराध्यक्ष म्हणून ही काटेंची मोठी कामगिरी होती. त्यातच राष्ट्रवादीचे ताकदवान नेते नाना काटे यांच्या पत्नीचा पराभव, त्यामुळे महापौर पद आता नक्कीच मिळेल, असा विश्वास होता. महापौरपदासाठी चर्चेत असलेल्या नावांमध्ये शत्रुघन काटेंचं नाव ‘कॉमन’ होतं. मात्र शेवटचा निर्णय आला आणि…२०१७ चा इतिहास पुन्हा जिवंत झाला! लक्ष्मणभाऊ नसले, तरी शंकर जगताप यांनी सूत्रे हलवली, आणि शत्रुघन काटे व महापौरपद यांच्यात पुन्हा एकदा ‘काटे’ टाकले गेले. वास्तविक, सध्यस्थितीला शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना मानणारा 17 ते 18 नगरसेवकांचा गट आहे. त्यामुळे मतदार संघाचे विभाजन झाल्यास चिंचवड मतदार संघात काटे विधानसभा निवडणुकीत दंड थोपाटतील, म्हणून त्यांना महत्त्वाच्या पदावर संधी दिली जात नाही. त्यासाठी ‘कॉम्प्रमाईज्ड’ राजकारण केले जाते. पक्षश्रेष्ठींसमोर त्या अनुशंगाने चित्र उभा केले जाते, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button