To The Point : ‘व्होट जिहाद’च्या भितीने हिंदूंना गृहित धरणारे नेते खरंच हिंदू आहेत का?
जुलुसला उत्साहाने हजेरी; पण जनआक्रोश, दुर्गा दौड पथसंचालनाकडे पाठ
पिंपरी-चिंचवड परिसरातील हिंदू बांधवांमधून व्यक्त होतोय आता नाराजीचा सूर
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
भारतात विविध पूजा पद्धती मानणारे सांप्रदाय आहेत. यात हिंदू, जैन, शीख, बौद्ध यांच्यासह ख्रिश्चन, पारसी आणि मुस्लिम अशा सर्व जाती-धर्मांच्या समाजाचा एकसंघ प्रदेश म्हणजे भारत. लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांवर आधारित असलेला या भारतामध्ये अर्थात पिंपरी-चिंचवडमध्ये हिंदूं बांधवांना हिंदू नेत्यांकडून गृहित धरले जात आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
काही दिवसांपूर्वी, पिंपरी-चिंचवडमधील सकल हिंदू समाजाने बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला. त्यावेळी जन्माने हिंदू असलेले महाविकास आघाडीतील हिंदू नेते या मोर्चात सहभागी झाले नाहीत. पण, त्यानंतर मुस्लिम बांधवांचा मोठा जुलुस झाला. त्यावेळी मात्र, महाविकास आघाडीतील इच्छुक सेवेत दाखल झाले. एव्हढेच नव्हेत, तर विविध फ्लेक्स तयार करुन शुभेच्छुक म्हणून झळकले होते.
‘‘सर्वधर्म समभाव’’ हा भारतीय संविधानाचा विचार असल्यामुळे जुलुसमधील सहभागाचे स्वागत आहेच. मग, हा न्याय हिंदू सण-उत्सवांच्या बाबतीत का दिला जात नाही. हिंदूंमध्ये पवित्र असलेली नुकताच विजयादशमी दसरा झाला. या निमित्ताने दुर्गामाता दौड किंवा पथसंचलनामध्ये महाविकास आघाडीचा एकही नेता सहभागी होताना दिसला नाही. बहुसंख्य हिंदू असलेल्या शहरात हिंदू नेत्यांना हिंदू सण-उत्सव आणि परंपरांमध्ये सहभागी होण्याची वेळ आली की, ‘सेक्युलॅरिझम’च्या नावाखाली हे नेते पाठ फिरवतात. ‘‘एकगठ्ठा’’ मतदानासाठी आपले हिंदूत्व विसतात.. हे शहरातील हिंदू बांधवांचे दुर्दैव म्हणावे लागेल, अशी खंत व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकीत हिंदूंना मोठा धडा मिळाला आहे. मुस्लिम समाजाने नियोजनबद्ध मतदान केले. पण, जाती-पोटजातीमध्ये विभालेला हिंदू मात्र एकजूट दाखवत नाही. हिंदूच हिंदूंचे शत्रू आहेत, असे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. ते खरेच आहे. ज्यांना जुलुसमध्ये सहभागी व्हावे असे वाटते, त्यांना हिंदूंचा जनआक्रोश मोर्चा दिसत नाही. दुर्गा दौड किंवा पथसंचालनात सहभागी व्हावे वाटत नाही, हा दुभाभाव नाही का? असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
हिंदू नेते धडा घेणार आहेत का?
जाती-पोटजातींमध्ये विभागलेला हिंदू समाज एकसंघ नाही. त्यामुळेच राजकीय नेते हिंदूंना गृहित धरतात. किंबहुना, बहुसंख्य असलेला हिंदू आजच्या घडीला प्रभावहीन झाला आहे. लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला. भारतात लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला. मुस्लिम समाजाने एकगठ्ठा मतदान केले. त्यामुळे भाजपाचा आलेख घसरला. पण, त्याच दरम्यान युरोपियन युनियनच्या निवडणुका पार पडल्या. या युनियनचे २७ देश सदस्य आहेत. या निवडणुकांमध्ये ४०० दशलक्ष मतदारांनी सहभाग घेतला. या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी पक्षांना फटका बसला आहे. यातून हिंदूं सण-उत्सवात सहभागी न होता, विशिष्ठ जाती-धर्मांचे राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीच्या हिंदू नेत्यांनी बोध घेतला पाहिजे. केद्रातील हिंदूत्ववादी म्हणून हिणवल्या जाणाऱ्या मोदी सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्वच जाती-धर्माचे नागरिक घेतात, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कोणतीही जात-पात पाहत नाही, याचा विचार केला पाहिजे. जाती-धर्मांच्या भिंती मोडून ‘‘Politics of performance and delivery’’ ला प्राधान्य दिले पाहिजे. महाविकास आघाडीचे नेते हिंदूंना एक वागणूक आणि विशिष्ट समाजाला वेगळी वागणूक देणार असतील, तर हिंदू समाजानेही एक झाले पाहिजे आणि जो आपल्या धर्माचा झाला नाही, तो कामाचा नाही.. ही बाब लक्षात घेतली पाहिजे.





