‘शरद पवारांचा वारसा रोहित पवार चालवणार असतील तर..’; सुप्रिया सुळेंचं भुवया उंचावणारं विधान
![Supriya Sule said that if Rohit Pawar will carry on the legacy of Sharad Pawar, what would I mind?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/mahaenews-15-4-780x470.jpg)
Supriya Sule | शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं होतं. रोहितने कधीही पदाची अपेक्षा केली नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आल्यानंतर रोहितने चांगलं काम केलं. पहिली पाच वर्षे तुमची सेवा करण्यासाठी आणि पुढची पाच वर्षे महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी असं शरद पवार म्हणाले. याबाबत सुप्रिया सुळे यांनीही भुवया उंचावणारं वक्तव्या केलं आहे.
कर्जत जामखेडमध्ये शरद पवारांनी रोहित पवारांविषयी जे वक्तव्य केलं त्याबाबत विचारलं असता. सुप्रिया सुळे म्हणाल्या, रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले किंवा शरद पवारांचा वारसा त्यांनी चालवला तर माझी हरकत असण्याचं कारणच काय? रोहितच का? माझ्या वडिलांचा वारसा कुणीही चालवू शकतं.
हेही वाचा – संभाजीराजे छत्रपतींच्या पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता, ‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ पक्षाचं चिन्ह
दरम्यान, शरद पवार यांनी रोहित पवारांबाबत जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या, रोहित पवार मुख्यमंत्री होणार का? या चर्चाही रंगल्या होत्या. आता सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांनी माझ्या वडिलांचा वारसा चालवला तरीही माझी काही हरकत नाही असं म्हटलं आहे. याचाच अर्थ शरद पवारांचा वारसा हा आता आगामी काळात रोहित पवार चालवताना दिसतील.