भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामना आता अंतिम टप्प्यात
जडेजा-अश्विन जोडीची कमाल,भारतासमोर विजयासाठी 94 धावांचं आव्हान
दिल्ली : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामना आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. दोन दिवस पाऊस पडल्यानंतर सामना ड्रॉ होईल अशीच शक्यता होती. पण टीम इंडियाने जबरदस्त खेळी केली. चौथ्या दिवशी कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले. बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 233 धावांवर आटोपला होता. त्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने अवघ्या 34.4 षटकात 285 धावा केल्या आणि 52 धावांची आघाडी घेतली. 9 विकेट गेल्यानंतर भारताने डाव घोषित केला. 52 धावांचा पल्ला गाठतानाच बांगलादेशच्या 3 विकेट गेल्या होत्या. शदमन इस्लामने अर्धशतकी खेळी केली.
या व्यतिरिक्त एकही फलंदाज तग धरू शकला नाही. खासकरून आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीपुढे बांगलादेशी फलंदाजांनी नांगी टाकली. बांगलादेशचा संपूर्ण संघ 146 या धावांवर बाद झाला. यातून 52 धावांची भारताची आघाडी वगळता फक्त 94 धावांचं आव्हान मिळालं आहे. हे आव्हान भारतीय सहज गाठेल असं दिसत आहे. त्यामुळे भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी मदत होईल.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालेद अहमद.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज